राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र : 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील स्त्री/पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास अर्थसहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

गरीब कुटुंबात कमावती व्यक्तीवर सर्व कुटुंबाचे जीवन अवलंबून असते त्यामुळे अशा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होते या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या स्त्री/पुरुषाचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक रकमी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा विचार केला आहे.

Table of Contents

वाचकांना विनंती

आम्ही राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हि माहिती त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

योजनेचे नावराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
उद्देशगरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य देणे
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे
लाभ20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना उद्देश

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Purpose

 1. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 2. गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
 3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
 4. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये.
Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना वैशिष्टये

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Features

 • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
 • लाभाची राशी लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • या योजनेसाठी राज्य शासन दरवर्षी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करते.
 • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक विकास होऊन ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
 • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकार देत आहे 3 लाखांची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

Rashtriya Kutumb Labh Scheme Maharashtra

 • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य

Maharashtra Rashtriya Kutumb Labh Yojana

 • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी 20,000/- रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते.

खालील कारणासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

Rashtriya Kutumb Arthsahay Yojana

 • आत्महत्या
 • आत्महत्येचा प्रयत्न
 • अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
 • स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
 • मोटार शर्यतीतील अपघात
 • गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
 • बाळंतपणातील मृत्यू
 • सैन्यातील नोकरी
 • जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
 • युद्ध

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Beneficiary

 • दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील व्यक्ती

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Benefits

 • एखाद्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक रकमी 20000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारेल.
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल व त्यामुळे ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • कुटुंबातील कमावती व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
 • कठीण परिस्थिती सरकार गरीब कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याची भावना कुटुंबामध्ये निर्माण होईल.
 • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक पात्रता

Maharashtra Rashtriya Kutumb Labh Yojana Eligibility

 • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अटी व शर्ती

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Terms & Condition

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरीकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल व त्यावरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री/पुरुष मृत्यु पावल्यानुंतर राष्ट्रीय कुटुुंब लाभ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना मृत्युच्या दिनांकापासून 3 वषाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे व त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्जदार कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आवश्यक कागदपत्रे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जन्माचे प्रमाणपत्र
 • बँक खात्याचा तपशील
 • प्रतिज्ञा पत्र
 • मृत्यू पत्र

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Application Process

 • अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोड़ून अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय यांचेजवळ जमा करावा लागेल.
 • अधिकारी जमा अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभाचे वितरण करतील.
Telegram GroupJoin
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना फॉर्मClick Here
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासन निर्णयClick Here
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अधिकृत वेबसाईटClick Here

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कोणत्या राज्यातील कुटुंबासाठी लागू आहे?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांसाठी लागू आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत किती रुपयांचा लाभ दिला जातो?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र अंतर्गत 20,000/- रुपयांचा लाभ दिला जातो.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा उद्देश काय आहे?

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा?

अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज करावा लागेल.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे महाराष्ट्र राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना संबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment