संजय गांधी निराधार योजना

महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते आज आपण राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मधून जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीस दरमहा 1,500/- रुपये आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये समावून घेतले जाईल.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
योजनेचे नावसंजय गांधी निराधार योजना
उद्देशनिराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य
लाभार्थीराज्यातील निराधार व्यक्ती
लाभलाभार्थी व्यक्तीस दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/ऑनलाईन

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही.
  • अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ मिळेल.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana

आवश्यक वयाची अट:

  • अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

आवश्यक वार्षिक उत्पन्न:

  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये.

दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीस दरमहा 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

योजनेचे लाभार्थी:

  • निराधार व्यक्ती
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
  • अपंगातील अस्तिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री-पुरुष
  • अनाथ मुले
  • देवदासी
  • घटस्पोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला
  • मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती
  • घटस्फोटीत स्त्रिया,
  • दुर्लक्षित महिला
  • वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया
  • अत्याचारी महिला
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
  • क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, प्रमस्तीष्कघात,एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला.
  • ट्रान्झेंडर इत्यादी.

लाभार्थ्यांची तपासणी प्रक्रिया:

  • प्रत्येकवर्षी  1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान संबंधित लाभार्थ्याना त्यांचे जेथे खाते आहे त्या बैंक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्तरकडे स्वत: हजर रहावे लागेल व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर / पोस्ट मास्तर करतील.
  • कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्याने नायब तहसिलदार तहसिलदार उप विभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी ) यांचे समोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसिलदाराकडे सादर करावे.
  • या योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी दर वर्षातून एकदा करण्यात येईल. या तपासणीत एखादा लाभार्थी ज्या कारणांमुळे अपात्र ठरत असेल त्याची कारणमीमांसा त्या लाभार्थीस कळवून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येईल.

योजनेचा फायदा:

  • निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

आवश्यक पात्रता व अटी:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीचे मिळकतीचे कुठल्याच प्रकारचे साधन असता कामा नये.
  • अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या नावे जमीन असता कामा नये.
  • अर्जदार व्यक्ती किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
  • अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत पेन्शन चा लाभ मिळवत असल्यास अशा परिस्थितीत त्या अर्जदारास संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अनाथ मुले/मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल.
  • जर लाभार्थीकडे फक्त मुलीच असतील, तर ते 25 वर्षांचे होतील किंवा अविवाहित असतील तरच लाभ कायम राहील.
  • मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय/ निमशासकीय/खाजगी) मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन.लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात येईल.
  • एखादा लाभार्थी मरण पावल्यास त्याला दिले जाणारे आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करण्यात येईल.
  • लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिनांकापर्यंचा हिशोब करुन ती योग्य प्रमाणात लाभार्थीच्या उतरजीवी व्यक्तीला, म्हणजे त्याची पत्नी/तिचे पती किंवा कायदेशीर वारसास देण्यात येईल.
  • मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तीला नोकर मिळेपर्यंत (शासकीय / निमशासकीय/ खाजगी) लाभ मिळेल. या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या (शासकीय / निमशासकीय / खाजगी) अविवाहीत मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करुन लाभार्थ्यांची पात्रता ठरविण्यात येईल.
  • अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर मतीमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतूदीप्रमाणे निर्णय होईल. (किमान 40 % अपंगत्व असलेल्या व्यक्तीस या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरतील)
  • घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील.
  • मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटूंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखीचा पुरावा (किमान -1)
    • अर्जदाराचा फोटो
    • (ओळखीचा पुरावा) पारपत्र
    • (ओळखीचा पुरावा) पॅन कार्ड
    • (ओळखीचा पुरावा) आधार कार्ड
    • (ओळखीचा पुरावा) मतदाता ओळखपत्र
    • (ओळखीचा पुरावा) निमशासकीय ओळखपत्र
    • (ओळखीचा पुरावा) आर एस बी वाय कार्ड
    • (ओळखीचा पुरावा) जॉब कार्ड
    • (ओळखीचा पुरावा) वाहन चालक अनुज्ञप्ती
  • अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
  • पत्त्याचा पुरावा (किमान -1)
    • (रहिवाशी दाखला) ग्रामसेवक/तलाठी/मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
  • इतर दस्तऐवज (किमान -1)
    • (प्रवर्गाचा दाखला) शिक्षा झाल्याबध्दल मा न्यायालयाच्या आदेशाची प्रत
    • (प्रवर्गाचा दाखला) विधवा असल्यास, मोठ्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र, असल्यास
    • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोट प्रक्रीयेतील स्त्रीया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या  राहणाऱ्या स्त्रीयांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलची संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेले व तहसिलदारांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
    • (प्रवर्गाचा दाखला) जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन), शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिलेला दाखला
    • (प्रवर्गाचा दाखला) पतीचेनिधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिकेच्या मृत्यु नोंदवहीतील उतारा संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषदेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहील.
    • (प्रवर्गाचा दाखला) तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका/महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र
    • (प्रवर्गाचा दाखला) या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला -घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश आणि पतीने द्यावयाच्या देखभाल रकमेचा पुरावा
    • (प्रवर्गाचा दाखला) अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ति अधिनियम 1995 मधील तरतूदीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन) यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
    • (प्रवर्गाचा दाखला) अनाथ असल्याचा दाखला – ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला
    • (प्रवर्गाचा दाखला) कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबत तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला
    • (प्रवर्गाचा दाखला) शारीरिक छळवणूक झालेल्या / बलात्कार झालेल्या अत्याचारित महिलेच्या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन) व महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र
    • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोटित मुस्लीम महिलेसंदर्भात तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जीदमधील काझीने त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारासमोर शपथपत्र अथवा गावामध्ये / शहरामध्ये मुस्लीम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी नोंदणीकृत संस्था असेल, त्या संस्थेने ठराव करून दिल्यास प्रमाणपत्र
    • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया, ज्या पती- पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही, अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणान्या स्त्रियांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी नायायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलचे संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका/महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र
    • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत, महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
    • आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  • वयाचा पुरावा (किमान -1)
    • (वयाचा दाखला) शाळा सोडल्याचा दाखला
    • (वयाचा दाखला) शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा
    • (वयाचा दाखला) ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उता-याची साक्षांकित प्रत
    • (वयाचा दाखला) ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.
  • उत्पन्नाचा पुरावा (किमान -1)
    • (उत्पन्नाचा पुरावा) तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदारकडून रु ५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार)

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार व्यक्तीस आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात तहसीलदार कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेसंबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

पहिला टप्पा:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर नवीन युजर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Registration

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे वैयक्तिक तपशील,अर्जदाराच्या निवासाचे तपशील, भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी, छायाचित्र, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा) भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर नोंदणी करा वर क्लिक करावे लागेल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana New Registration Form

  • अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरा टप्पा:

  • आता तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Sanjay Gandhi Niradhar Yojana
Official Website
Click Here
Sanjay Gandhi Niradhar Yojana
Helpline Number
1800-120-8040
Niradhar Yojana In Maharashtra FormClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!