महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन अशा कुटुंबांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते.
आज आपण राज्यातील विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या कुटूंबातील मुलींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे.
समाजात आज सुद्धा काही कुटुंबे हि मुलींना मुलांच्या तुलनेत कमी महत्व देतात व ते मुलींच्या शिक्षणाला सुद्धा कमी महत्व देतात व मुलींना शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित ठेवतात.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि अजून सुद्धा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत तसेच त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करता येत नाहीत तसेच त्यांना आपल्या मुलींना योग्य शिक्षण सुद्धा देता येत नाही त्यामुळे अशा गरीब परिवारातील मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात.
कुटुंबाची आर्थिक स्थिती गरीब असल्या कारणामुळे त्यांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागते तसेच जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागतात व घेतलेले कर्ज वेळेवर फेडू न शकल्यामुळे अशा परिवारातील आई वडिलांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आई वडिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुला/मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणे जेणेंकरून विद्यार्थी आर्थिक अडचणीशिवा स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी |
लाभ | शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ |
उद्देश | राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना उद्देश
- महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सदर शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- विद्यार्थींनींचे वर्गातील गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते.
- राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेअंतर्गत मुलीचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- मुलीचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी हातभार लावणे.
- मुलींना समाजात मनाचे स्थान मिळवून देणे.
- समाजात मुलींबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करणे.
- राज्यात गरीब कुटुंबातील मुलींना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- आपल्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे हा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली आहे.
- राज्यात होणारी भ्रूणहत्या थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढविणे.
- मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुढील भविष्य सुरक्षित करणे.
वैशिष्टय
- महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना एक महत्वाची अशी एक योजना मानली जाते.
- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शिक्षणासाठी अर्थसहाय्य देऊन राज्यातील मुलीचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दुर्ष्टीने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना ठरणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑफलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थिनीच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
विद्यर्थिनींना महत्वाच्या सूचना
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्याथ्यांनीच अर्ज करावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थिनींनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थिनींनी पुन्हा अर्ज करू नयेत.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी असून मुलांनी अर्ज करू नयेत.
- विद्यार्थिंनींनी ऑफलाईन अर्ज भरताना अचुक व परिपुर्ण माहिती भरावी व अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी
- अर्जदार विद्यार्थिनीचे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे.
- विद्यार्थिनीने बँकेची माहिती भरताना स्वत:चे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमुद करावी. पालकांची अथवा इतर व्यक्तीचा बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
- ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थिनीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत इतर कोणतेही कागदपत्रे अपलोड करू नये.
योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीस दरमाह 60/- रुपये याप्रमाणे 10 महिन्या करीता 600/- रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल.
- इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीस प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये 100/- प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्ती दर व कालावधी
- 5वी ते 7वी दरमहा 60/- रुपये प्रमाणे 10 महिन्याचे 600/- रुपये.
- 8वी ते 10वी दरमहा 100/- रुपये प्रमाणे 10 महिन्याचे 1000/- रुपये अदा केले जातात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गया प्रवर्गासाठी लागू आहे.
योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठीच लागू आहे.
- प्रायव्हेट शाळेत शिकणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट राहणार नाही.
- विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे त्यामुळे उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते.
- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थिनींचे अर्ज भरतील त्यामुले मुलींना तसेच पालकांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
योजनेचा लाभ
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील विजाभज / विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती च्या रूपाने आर्थिक सहाय्य केले जाते.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थिनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना तसेच इयत्ता ८वी ते इयत्ता १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीस या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेच्या मदतीने राज्यातील विजाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनीचे जीवनमान सुधारेल.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या सहाय्याने शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थिनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
- राज्यातील मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
- गरीब कुटुंबातील मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहतील
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित होईल.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे
योजनेच्या अटी व शर्ती
- केवळ महाराष्ट्रात राज्यातील मुलींनाच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थीनी इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी मध्ये शिकणारी असावी.
- अर्जदार विद्यार्थिनीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थिनीने खोटी माहिती देऊन जर या योजनेअंतर्ग लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेमधून रद्द केले जातील व कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
- मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
- विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
- अर्जदार विद्यार्थिनीचे आई किंवा वडील एखाद्या सरकारी सेवेत कार्यरत असल्यास अशा वियार्थिनीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
- वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
- शपथ पत्र
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला तुमचा User Id व Password तसेच Capcha टाकून लॉगिन करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये युजर तपशील मध्ये तुम्हाला शाळेची माहिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला शाळेची माहिती/मुख्याध्यापक संपर्क तपशील/शाळेचा विद्यार्थी प्रवेशित संख्या तपशील भरावा लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जातं करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये शिष्यवृत्ती व्यवस्थापन मध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती शाळेची माहिती/अर्जदाराची माहिती/पत्याची माहिती/बँकेची माहिती भरून जतन करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला अर्ज मंजुरीसाठी पाठवा वर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल ती तपासून पहा व काही माहिती दुरुस्थी करायची असल्यास ती दुरुस्त करून घ्या व सर्व माहिती योग्य असल्यास सबमिट बटनावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत तक्रार करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर आपली तक्रार पोस्ट करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला POST GRIEVANCE वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकून Verify बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो टाकून Verify बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Post Grievance वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर Grievance Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तक्रार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join Here |
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
कार्यालय पत्ता | ठाकरसी हाऊस , दुसरा मजला, जे. एन. हरडिया रोड , बॅलार्ड इस्टेट , मुंबई 400 001 |
Contact Number | (022) 22621934 |
regionofficemumbai21[at]gmail[dot]com eschol[dot]support[at]maharashtra[dot]gov[dot]in |