शबरी घरकुल योजना : Shabari Awas Yojana

केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध योजना राबवित असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन देखील आपल्या राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत घरे बांधून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार विविध योजनांची सुरुवात करत असते.

आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना मोफत घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव शबरी घरकुल योजना 2022 आहे.

Table of Contents

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमाती मधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही तसेच ते स्वतःचे घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत अशा कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य दिले जाते व सोबत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य देण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमाती मधील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यांच्या जवळ रहायला स्वतःचे पक्के घर देखील उपलब्ध नसते. आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे अशा कुटुंबांना कच्च्या पडक्या घरात रहावे लागते त्यामुळे त्यांना ऊन, पाऊस तसेच थंडीचा सामना करावा लागतो अशा प्रकारे त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील अनुसूचित जमातीमधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना स्वतःचे घर बांधून देण्यासाठी शबरी घरकुल योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमाती मधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य देणे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील 18544 कुटुंबांना घर बांधून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत राबविला जाणारा विशेष उपक्रम

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्या कारणामुळे त्यांना घरकुलाचे लाभ देणे शक्य नसते. त्यासाठी केंद्र शासनाने पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी 50000/- रुपये किंवा प्रत्य‍क्ष जमिनीची किंमत यांपैकी जी रक्कम कमी असेल ती या योजनेतुन मंजूर केली जाते. जेणेकरुन प्रत्येक गरीब कुंटुबाला जागा खरेदी करून  स्वत:चे घर बांधता येईल.

वाचकांना विनंती

आम्ही शबरी घरकुल योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जमाती मधील गरीब कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे पक्के घर बांधू शकतील.

योजनेचे नावशबरी घरकुल योजना
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील अनुसूचित जमातीमधील रहायला स्वतःचे घर नसलेली कुटुंबे
लाभप्रति कुटुंब 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
उद्देशघरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

शबरी घरकुल योजनेचा उद्देश

shabari awas yojana purpose

 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीमधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शबरी घरकुल योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • अनुसूचित जमातीमधील कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
 • ज्या कुटुंबांकडे रहायला स्वतःचे पक्के घर उपलब्ध नाही अशा कुटुंबांचा या योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये असेच त्यांना कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • जी कुटुंबे कच्च्या पडक्या घरात राहतात अशा कुटुंबांचे या योजनेअंतर्गत ऊन, पाऊस व थंडीपासून संरक्षण करणे.
 • राज्यातील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा सामाजिक स्तर उंचावणे.
 • राज्यातील गरीब कुटुंबांची आर्थिक उन्नती करणे.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावणे.

शबरी घरकुल योजनेची वैशिष्ट्य

shabari awas yojana features

 • महाराष्ट्र शासनाद्वारे शबरी घरकुल योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना मानली जाते.
 • राज्यातील ज्या कुटुंबाकडे रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही अशा कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शबरी घरकुल योजना फायद्याची ठरणार आहे.
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदारास कुठल्याच प्रकारचा सामना करावा लागू नये यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • या योजनेच्या लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • शबरी घरकुल योजनेनंतर्गत 18544 कुटुंबांना घरे बांधून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.
 • या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला 5 टक्के आरक्षण दिले जाईल.
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

शबरी घरकुल योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य

राज्यातील आदिवासी जमात, पारधी जमात, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे तसेच विधवा महिला, निराधार महिला, दुर्गम क्षेत्रातील कुटुंबे, दिव्यांग महिला, घटस्फोटित महिला, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब या सर्वांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते

शबरी घरकुल योजनेअंतर्गत दिले जाणारे आरक्षण

शबरी घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबांना 5 टक्के आरक्षण देण्यात येते.

शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी

shabari awas yojana beneficiary

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जमातीमधील कच्या, मातीच्या, पडक्या घरात राहणारी तसेच ज्यांच्याजवळ रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही तसेच ते स्वतःचे घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत अशी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

शबरी घरकुल योजनेचे लाभ

shabari awas yojana benefits

 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे ज्यांच्याजवळ राहण्यासाठी पक्की घरे नाहीत अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करून देण्यात येते.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे स्वतःचे घर बांधण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील अनुसूचित जमातीमधील ज्या कुटुंबांकडे रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही तसेच कच्च्या पडक्या घरात राहतात आहेत व ते स्वतःचे घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत अशा कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीमधील कुटुंबे स्वावलंबी बनतील
 • राज्यातील गरीब कुटुंबांचा सामाजिक स्तर उंचावेल
 • राज्यातील गरीब कुटुंबाचे भविष्य उज्वल बनेल
 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे स्वतःच्या पायावर उभे राहतील.
 • ज्या कुटुंबांकडे रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही तसेच ते पडक्या घरात राहतात त्यांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत पक्या स्वरूपाचे घर बांधून दिले जाईल त्यामुळे त्यांचा ऊन, पाऊस व थंडीपासून संरक्षण मिळेल.
 • राज्यातील जी कुटुंबे स्वतःचे घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत अशा कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर मिळेल.
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना

शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दिले जाणारे आर्थिक सहाय्य

shabari awas yojana financial assistance

ग्रामीण क्षेत्र1.32 लाख रुपये
नक्षलवादी व डोंगराळ भाग1.42 लाख रुपये
नगरपरिषद क्षेत्र1.50 लाख रुपये
नगरपालिका क्षेत्र2 लाख रुपये

घराच्या बांधकामात लाभार्थी कुटुंब स्वतःच्या आवडीनुसार बदल करू शकतो परंतु जर निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च झाल्यास वरील रक्कम लाभार्थ्यास स्वतः जवळील भरावी लागेल निर्धारित रकमेच्या वरील रक्कम शासनाद्वारे दिली जाणार नाही.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया

shabari awas yojana selection process

शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची निवड करताना त्यांच्या पडीक, मातीच्या कच्च्या घराची प्रत्यक्ष पाहणी केली जाते व त्यानंतरच लाभार्थ्यांची निवड करण्यात येते व ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत लाभार्थ्यांची निवड करून मंजुरी देण्यात येते.

शबरी घरकुल योजनेची कार्यपद्धती

shabari awas yojana procedure

 • शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड झाल्यानंतर लाभार्थीच्या राहत्या कच्च्या, पडक्या घराचे Geo Tag, Job Card Mapping केले जाते.
 • निधी वितरित करण्यासाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्न करुन पंचायत समिती लाभार्थीची नावे जिल्हा स्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित केले जाते.
 • जिल्हा स्तरावरुन मान्यता प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याला तालुका स्तरावरुन पहिला हफ्ता DBT च्या साहाय्याने बँकेत जमा केला जातो.
 • लाभार्थीने स्वत:च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्याला स्वत:च्या अपेक्षेनुसार घर बांधता येईल यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत असणार नाही
 • घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा व तालुका स्तरावरून आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला दुसरा हफ्ता, तिसरा हफ्ता व अंतिम हप्ता भौतिक प्रगतीशी संसंगत पध्दतीने अदा केला जातो.
 • लाभार्थ्यास मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार दिला जातो त्यासाठी 18000/- रुपये इतकी रक्कम अदा केली जाते.
 • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वचतंत्र्यपणे 12000/- रूपये इतकी रक्कम उपलब्ल करुन दिली जाते.

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता

shabari awas yojana elibility

 • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • इयत्ता 10वी व 11वी च्या शिक्षणासाठी सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 60 हजारांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा स्वाधार योजना

शबरी घरकुल योजनेच्या अटी व शर्ती

shabari awas yojana terms & condition

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच शबरी घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त अनुसूचित जमाती मधील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • अर्जदार कुटुंबाचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्तीकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे किंवा शासनाद्वारे दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्तीकडे पक्के घर असता कामा नये.
 • शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये
 • ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असता कामा नये
 • अर्जदार व्यक्तीने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या घरकुल योजनेचा लाभ मिळवला नसावा.
 • अर्जदार कुटुंबाच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असता कामा नये.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

shabari awas yojana documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
 • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • अर्जदार महिला घटस्फोटित असल्यास न्यायालयाचा आदेश
 • जागेचा 7/12 उतारा तसेच 8अ दाखला
 • ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
 • बँक खात्याचा तपशील

घरकुल योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार कुटुंब अनुसूचित जमाती मधील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदाराकडे जातीचा दाखला नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार कुटुंबाने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

shabari awas yojana application process

ग्रामीण क्षेत्र

ग्रामीण भागातील अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जावे लागेल व कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.

शहरी क्षेत्र

शहरी भागातील अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नगर पालिका किंवा महानगर पालिका कार्यालयात जावे लागेल व कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Telegram GroupJoin
शबरी घरकुल योजना अर्ज pdfClick Here
 • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

शबरी घरकुल योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

शबरी घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील अनुसूचित जमातीमधील ज्या कुटुंबांकडे रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाहीत अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत किती आर्थिक सहाय्य्य केले जाते?

शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला स्वतःचे घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते व शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.

शबरी घरकुल योजनेचा उद्देश काय आहे?

ज्या कुटुंबाकडे रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शबरी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

शबरी घरकुल योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

सारांश

आशा करतो कि शबरी घोकूल योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले शबरी घोकूल योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment