महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी प्रयत्नशील असते आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव शासन आपल्या दारी योजना आहे.
महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते परंतु बऱ्याच नागरिकांना या योजनांची माहिती नसते तर बर्याचदा नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात व अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाच वाया जातो व योजनांचा लाभ देखील मिळत नाही त्यामुळे शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बाल विकास, भूमिअभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.यामध्ये शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला), मतदारनोंदणी, आधार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंबकल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाहनोंदणी,कुपोषित बालकांची तपासणी, जमीनमोजणी, भूमापन, प्रॉपर्टी कार्ड, कृषी अवजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनावरांची तपासणी शिबिर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सरकारी योजनांचा समावेश आहे
योजनेचे नाव | शासन आपल्या दारी योजना |
योजनेची सुरुवात | 2023 |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | शासनाद्वारे सुरु योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणे |
योजनेचा लाभ | राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनांसाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
- सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
- योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
- एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी हि योजना राबविण्यात आली आहे.
- या योजनेद्वारे शासन थेट नागरिकांच्या दारी येत आहे.
- या योजनेअंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक शासन आपल्या दारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- राज्यातील नागरिकांना एकाच पोर्टलवर सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे ते त्यांना उपयुक्त योजनांसाठी अर्ज करू शकतील व योजनेचा लाभ मिळवू शकतील.
- कामगार, कष्टकरी, शेतकरी, विदयार्थी, महिला, दिव्यांग बांधव, आदिवासी बांधव आदी समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून सरकारने शासन आपल्या दारी अभियान हाती घेतले आहे
- नागरिकांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व ते घरबसल्या आपल्या मोबाईल व कॉम्पुटर च्या सहाय्याने अर्ज करू शकतील ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
- सुविधांमध्ये सहज प्रवेश: शासन आपल्या दारी योजनेद्वारे, नागरिकांना आता विविध योजना आणि सेवांसाठी सरकारी कार्यालयात फिरण्याची गरज नाही.
- वेळ आणि पैशाची बचत: या योजनेमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते कारण त्यांना आता विविध सुविधांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.
- पारदर्शकता आणि जबाबदारी: या योजनेमुळे सरकारी योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनते.
- समावेशकता: शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिक पात्र आहेत.
- भ्रष्टाचारावर कमी: एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध झाल्याने भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते.
योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रम:
- आरोग्य शिबिर
- रोजगार मेळावे
- रक्तदान शिबिर
- पासपोर्ट
- कृषी सेवा केंद्राचे परवाने
- सेवानिवृत्त लाभ
- आधार कार्ड सुविधा
- पॅन कार्ड सुविधा
- पीएम किसान योजना
- विवाह नोंदणी
- ई-श्रम कार्ड
- भरती मेळावा
- पीएफ घरकुल योजना
- मनरेगा
- जॉब कार्ड
- डिजिटल इंडिया
- सखी किट वाटप
- शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
- मुलींना सायकल वाटप
- नवीन मतदार नोंदणी
- दिव्यांग साहित्य वाटप
- शिकाऊ चालक परवाना
- कृषी प्रदर्शन
योजनेच्या अटी व शर्ती:
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेअंतर्गत योजनांचा लाभ मिळवण्याची पद्धत:
- नागरिक महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून त्यांच्यासाठी उपयुक्त अशा योजनांचा लाभ घेऊ शकतात किंवा एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन Shasan Aplya Dari योजनांचा लाभ घेऊ शकतात.
Telegram Group | Join |
Shasan Aaplya Daari Official Link | Click Here |
Toll Free Number | 1800-233-7360 |
महत्वाच्या गोष्टी:
- ही योजना सध्या महाराष्ट्र राज्यात राबवली जात आहे.
- योजना आणि त्यात समाविष्ट असलेल्या सेवांमध्ये बदल होऊ शकतात.
- अद्ययावत माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.