शेळी पालन योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी कमी व्याज दरात 10 लाख ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राज्यातील ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत अशा नागरिकांना राज्य सरकार कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे जेणेकरून ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करून स्वतःचा आर्थिक विकास करतील व राज्यात इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतील.
राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे व शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु शेळी व मेंढी खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेसा पैसे उपलब्ध नसतो त्यामुळे त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करता येत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने Sheli Mendhi Yojana सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
राज्यातील पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शेळी पालन योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | Sheli Mendhi Palan Yojana |
लाभ | 10 लाख ते 50 लाख रुपये |
उद्देश्य | पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे. |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक व अन्य नागरिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
शेळी पालन योजनेचे उद्दिष्ट
- राज्यात पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वरोजगार उपलब्ध करून देणे हा पंचायत समिती शेळी पालन योजना चा मुख्य उद्देश आहे.
- राज्यात दूध आणि मांस यांच्या उत्पादनात वाढ करणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करून नवीन उद्योग निर्माण करणे व राज्याचा आर्थिक विकास करणे.
- शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच शेळी-मेंढीपालन या परंपरेला चालना देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळी पालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील शेतकरी,पशुपालक व सामान्य नागरिक या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य:
- ज्या नागरिकांनी पशुपालन प्रशिक्षण प्राप्त केले आहे अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान अंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंब
- अल्प व अत्यल्प भूधारक (1 हेक्टर पर्यंतचे भू धारक)
- अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले)
- महिला बचत गटातील लाभार्थी
योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
शेळीपालन कर्ज अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवार्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते.
100 मादी व 5 नर या करिता अनुदान | 10 लाख रुपये |
200 मादी व 10 नर या करिता अनुदान | 20 लाख रुपये |
500 मादी व 25 नर या करिता अनुदान | 50 लाख रुपये |
योजनेचा फायदा:
- राज्यातील शेतकरी,पशुपालक,नागरिक यांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
- शेळीचे दूध व लोकर इत्यादी उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मेंढी पालन योजना चा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या Shelipalan Yojana अंतर्गत लाभ घेतला असता कामा नये.
- जी व्यक्ती पशुपालन करण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्याजवळ शेळी ठेवण्यासाठी स्वतःच्या मालकीची किमान 9 हजार वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे ज्यांमध्ये 100 शेळ्या व 5 मेंढे राहू शकतील.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर असणे आवश्यक आहे.
- पशुपालकाकडे शेळ्या मेंढ्यांची देखभाल व त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे चारा उगवण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला स्वतःजवळील 2 रुपये भरणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला शेळी मेंढी पालनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- अर्जदार अनुसूचित जाती / जमाती चा असल्यास त्याला अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्डवर जेवढे सदस्य आतील त्या सर्व सदस्यांची नावे व त्यांचा आधार नंबर इत्यादी माहिती सादर करणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- जमिनीचा 7/12 व 8अ
- पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.
- हमीपत्र / बंधपत्र
Sheli Mendhi Palan Yojana Online Application:
- अर्जदाराला शेळी पालन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर शेळी मेंढी पालन योजना अर्ज वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची शेळी पालन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Sheli Mendhi Online Application:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
- कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची शेळी पालन योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ शेळी पालन योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
शेळी मेंढी गट वाटप योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
शेळीपालन कर्ज योजना ई-मेल आयडी | ahyojana2022[at]gmail[dot]com |
शेळी पालन योजना महाराष्ट्र हेल्पलाईन नंबर | 1800-233-0418 / 1962 |
पंचायत समिती शेळी पालन योजना अर्ज | Click Here |
Sheli Mendhi Palan Online Application | Click Here |
Sheli Palan Online Form | Click Here |
Sheli Palan Yojana Online Form Maharashtra | Click Here |
5 te 10 shelyasathi anudan milate ka?
नक्की मिळेल