Shravan Bal yojana Documents In Marathi 2024

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रतिमहिना 400/- रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते तसेच याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रतिमहिना 200/- रुपये दिले जातात. असे एकूण दरमहा 600/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे अशा कुटुंबांना त्यांच्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्धापकाळातील औषोधोपचाराचा खर्च परवडणारा नसतो त्यामुळे ते घरातील वृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात.तसेच वृद्ध नागरिकांकडे वृद्धपकाळात कमाईचे कुठल्याच प्रकारचे साधन नसते त्यामुळे ते आर्थिक दृष्ट इतर लोकांवर अवलंबून असतात त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते त्यामुळे राज्यातील वृद्ध व्यक्तींना आर्थिक पाठबळ मिळावे तसेच त्यांचा आर्थिक विकास व्हावा व त्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील  65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ची सुरुवात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देणे.

योजनेचे नावShravan Bal Yojana
योजनेचा उद्देशराज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन देणे.
योजनेचा लाभप्रति महिना 1500/- रुपयांचे अर्थ सहाय्य
टोल फ्री क्रमांक1800-120-8040
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

श्रावण बाळ योजनेचे उद्दिष्ट

  1. महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देणे.
  2. वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धोपकाळात जीवन जगणे सोपे व्हावे.
  3. वृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ देणे.
  4. वृद्ध नागरिकांना समाजात सन्मानाने  जगता यावे.
  5. राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना स्वावलंबी जीवन जगता यावे.
Shravan Bal yojana Documents In Marathi

श्रावण बाळ योजनेचे वैशिष्ट्य

  • श्रावणबाळ योजना हि महाराष्ट्र सरकारची राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

श्रावणबाळ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्या प्रवर्गाचे नाव

  • श्रावण बाळ अनुदान योजना राज्यातील सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रतिमहिना 1,500/- रुपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते.

श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील वयोवृद्ध व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

श्रावण बाळ योजनेचे फायदा

  • महाराष्ट्र राज्यात ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयांच्या आत आहे अशा वृध्दांना राज्य शासनाकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रतिलाभार्थी  प्रतिमहिना 1500/- रुपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते.
  • वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळेल.
  • वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धोपकाळात जीवन जगणे सोपे होईल.
  • राज्यातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धोपकाळात दैनंदिन जीवनासाठी तसेच औषोधोपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
  • वृद्ध नागरिक त्यांच्या वृद्धकाळात मानाने जगातील.
  • राज्यातील निराधार तसेच वंचित वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनतील.
  • दारिद्र्य रेषेखाली नाव नसलेल्या वृद्ध नागरिकांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल.

श्रावण बाळ योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी

  • अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती किमान 15 वर्षे महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 65 व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • 65 वर्षे वयाखालील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जात कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे
  • अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये.

श्रावण बाळ योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पॅन कार्ड
  • जेष्ठ नागरिक कार्ड
  • वयाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदान कार्ड

श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराने सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालय / तहसलिदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय यांमध्ये संपर्क साधावा. या अधिकाऱ्यांकडून सदर योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावीत व अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
श्रावण बाळ योजना फॉर्म pdfClick Here
Shravan Bal Yojana Form PDF MarathiClick Here
Shravan Bal Yojana Toll Free Number1800-120-8040
Shravan Bal Yojana Beneficiary ListClick Here
श्रावण बाळ योजना Online FormClick Here

Leave a Comment