राज्यातील सर्व जिल्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे 2000/- रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा तद्नुषंगिक खर्च तसेच विवाह नोंदणी शुल्क या होणारा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते.
Shubhmangal Vivah Yojana चा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी / शेतमजुरांच्या मुलींना लग्नासाठी आर्थिक सहाय्य देणे आहे.

योजनेचे नाव | Shubh Mangal Vivah Yojana |
उद्देश | लग्नासाठी आर्थिक सहाय्य देणे |
लाभार्थी | शेतमजूर / शेतकऱ्यांच्या मुली |
लाभ | 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी / शेतमजूर यांच्यावर मुलीच्या विवाहाच्या सोहळ्याचा आर्थिक बोजा पडू नये या उद्देशाने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- शेतकरी / शेतमजुरांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या / शेतमजुराच्या मुलीच्या सामूहिक विवाहासाठी सुरु करण्यात आलेली शुभ मंगल सामूहिक विवाह योजना महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
- शुभमंगल सामूहिक विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) मार्फत राबविण्यात येते.
- एखादे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह करतील तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत 10 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
- योजनेअंतर्गत लाभार्थी वधूस 10 हजार रुपयांचे असून देण्यात येते तसेच विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस 2 हजार रुपये देण्यात येतात.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी / शेतमजुरांच्या मुली शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:
- या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतमजूर / शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी 10 हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावाने आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने व आई वडील दोघेही हयात नसल्यास मुलीच्या नावाने देण्यात येते. तसेच सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस विवाहाचे आयोजन व विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी प्रोत्साहनात्मक 2 हजार रूपये अनुदान देण्यात येते.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी / शेतमजुरांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- मंगळसूत्र आणि इतर विवाहसंबंधी वस्तू खरेदीसाठी मदत
- विवाह समारंभ आणि विवाह नोंदणीसाठी मदत
- स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन अनुदान
- विवाह साहित्य पुरवठा.
- विवाह विधी आणि नोंदणीसाठी मदत.
- वस्तीपत्र आणि लग्नपत्रिका छपाईसाठी मदत.
- सामाजिक कार्यक्रमासाठी मदत.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचं अलभ दिल जाणार नाही.
- फक्त पहिल्या विवाहासाठीच लाभ दिला जाईल.
- अर्जदार मुलगी शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- या योजनेअंतर्गत सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील.
- वधू ही महाराष्ट्रा राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याबाबत ग्रामसेवक / तलाठी यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असता कामा नये.
- वधू-वर पुनर्विवाह करत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल.
- या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्यांना दिला जाणार नाही कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वत्रंत्र योजना राबविण्यात येत आहेत.
- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला कमी वेळात कागदपत्रांची छाननी करणे, जोडप्यांची पात्रता निश्चित करणे इत्यादि शक्य व्हावे, याकरीता एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील तसेच 100 जोडप्यांच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळयासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही कारण 100 पेक्षा मोठे समारंभ आयोजित करणाऱ्या संस्थांची स्वतःची आर्थिक क्षमता चांगली असणे अपेक्षित आहे.
- एका स्वयंसेवी संस्थेला वर्षात फक्त 2 वेळाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे आयोजित केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान देण्यात येणार नाही.
- स्वयंसेवी संस्थेला लग्नाच्या 1 महिना अगोदर महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांना अर्ज व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे तसे न केल्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांच्या लग्नाचे विडिओ रेकॉर्डिंग तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- वधु वराचे आधार कार्ड
- गावाचे रहीवासी असल्यास ग्रामसेवक / तलाठी यांचा रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- पालकाच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून संबंधीत शेतकऱ्याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वधुच्या वडीलांचे / आईचे)
- जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत.
- लग्नाचा दाखला
- बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबत वर/वधू यांनी लिहुन द्यावयाचे विहीत नमूण्यात प्रतिज्ञापत्र.
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार वधू शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील नसल्यास
- अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागात जाऊन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज विभागातील अधिकाऱ्यांना जमा करावा लागेल.
- तसेच स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान 1 महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्याची व्हिडीओ रेकॉर्डींग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थेने सादर करणे आवश्यक आहे
Telegram Group | Join |
शुभमंगल विवाह योजना फॉर्म PDF | Click Here |
शासन निर्णय | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
जर मुलगी शेतकरी ची नसली तर ती गरीब नसते अस काही आहे का ….
आणि मुलगा मूळचा गुजरातचा पण बालपणापासून महाराष्ट्रात राहत असल्यास तो महाराष्ट्रीयन नाही का…
शुभ मंगल विवाह योजना मुलीच्या विवाहासाठी थोड्याफार प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे अर्जदार मुलगी फक्त शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक नाही तसेच मुलगा कुठल्याही राज्यातील असल्यास काही हरकत नाही.त्यामुळे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.