सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र: दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे  देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार कडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करण्यात येते.
आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रुफटॉप बसविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनल च्या खरेदीवर अनुदान देण्यात येते जेणेकरून राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील ज्यामुळे सरकार वर पडणारा विजेचा भार कमी होईल.

Table of Contents

या योजनेच्या सहाय्याने नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनल च्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे व राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनीवरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी करणे आहे. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]

वाचकांना विनंती

आम्ही सोलर रूफटॉप सब्सिडी योजना मराठी ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी नागरिक असतील जे  सौर पॅनल खरेदी करण्यासाठी इच्छूक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

योजनेचे नावसोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र
योजनेचा लाभसोलर पॅनल खरेदीसाठी अनुदान देणे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील सर्व नागरिक
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना हेल्पलाईन नंबर1800-180-3333
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • घरगुती सौर ऊर्जा योजना ची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे
  • राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील नागरिकांना विजेसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • नागरिकांना विजेचे बिल भरण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शासनावरील वाढत चाललेला विजेचा भर कमी करणे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

घरगुती सोलर पॅनल योजना चे वैशिष्ट्य

  • केंद्र सरकार द्वारे सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल.
  • राज्यातील नागरिक सशक्त तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महत्वाची ठरणार आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारास अर्ज करण्यासाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]
  • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ला लागणाऱ्या जागेची आवश्यकता

  • सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अंतर्गत 1 किलो वॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी 10 वर्ग मीटर जागेची आवश्यकता लागते.

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना चा लाभ

  • या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल वर केंद्र सरकार कडून अनुदान देण्यात येते त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळवू शकते आणि स्वतःच्या घराच्या,कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची 25 वर्षाची गॅरंटी असते त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसविल्यावर उपभोक्त्यास कुठल्याच प्रकारच्या खर्चाची आवश्यकता नसते.
  • सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक फायदा होईल.
  • नागरिकांना लोडशेडिंग चा सामना करावा लागणार नाही व त्यांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते त्यामुळे पुढील 20 वर्षे उपभोक्ता मोफत विजेचा वापर करू शकते.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्ती मिळेल.
  • या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा फायदा होईल.
  • नागरिकांना विजेचे बिल भरण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत सोलर पॅनल च्या सहाय्याने मोफत वीज निर्मिती करता येते.
  • या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानी ना पोहचवता वीज निर्मिती करणे शक्य होईल.
  • आणि उर्वरित वीज शासनाला विकत येते त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]

घरावरील सोलर पॅनल योजना चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.

Rooftop Solar Yojana Maharashtra अंतर्गत दिले जाणारे अनुदान

  • या योजनेअंतर्गत 3 KW क्षमतेचे सोलर पॅनल च्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून 40 टक्के अनुदान देण्यात येते.
  • 3 KW पेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल च्या खरेदीसाठी 20 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
  • सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]
  • इयत्ता 10वी व 11वी च्या शिक्षणासाठी सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 60 हजारांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा स्वाधार योजना

सौर ऊर्जा योजना महाराष्ट्र अंतर्गत सोलर पॅनल ची किंमत

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरणकिंमत
1 किलोवॅट46,820/- रुपये
1 ते 2 किलोवॅट42,470/- रुपये
2 ते 3 किलोवॅट41,380/- रुपये
3 ते 10 किलोवॅट40,290/- रुपये
10 ते 100 किलोवॅट37,020/- रुपये

Solar Panel Yojana Maharashtra अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा स्थायी रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Rooftop Solar Subsidy In Maharashtra अंतर्गत आवश्यक नियम व अटी

  • ज्या गावात, दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही आहे अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच सोलर रूफटॉप सब्सिडी योज़नेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती ज्या जागेत सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा त्याच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे;
  • अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]

घरावर सोलर योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जमिनीचा7/12
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • विजेचे बिल
  • ज्या जागेवर सोलर पॅनल बसवणार त्या जागेचा तपशील
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

Gharguti Solar Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

पहिले चरण:

  • अर्जदारास सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर Register Here वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर Registration Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती ( State Distribution Company Consumer Account Number ) भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यावर Next बटनावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर,मोबाईल ओटीपी,ई-मेल आयडी टाकावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

दुसरे चरण:

  • आता तुम्हाला होम पेज वर Login Here वर क्लिक करून Registered Consumer Account Number व Registered Mobile टाकून Login करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये Rooftop Solar वर क्लिक करावे लागेल.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र

तिसरे चरण:

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच विचारलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]
Telegram GoupJoin
Solar Rooftop Yojana Official WebsiteClick Here
Solar Rooftop Yojana Helpline Number1800-180-3333

सोलर योजना महाराष्ट्र अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

Solar Yojana Maharashtra कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

सोलर रूफटॉप सब्सिडी योजना केंद्र सरकार द्वारे संपूर्ण देशातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.

रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र चा उद्देश काय आहे?

राज्यातील नागरिकांना अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे

सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारिक काय आहे?

सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर केली गेली नाही आहे.

सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा हेल्पलाईन नंबर काय आहे?

सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा हेल्पलाईन नंबर 1800-180-3333 आहे.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Maharashtra Solar Subsidy ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा  तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल. [सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र]

2 thoughts on “सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु”

  1. या योजनेसाठी उत्पन्नाची अट किती आहे जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला ही योजना घेता येते का कमीत कमी किती उत्पन्न असावे

    Reply
    • राज्यातील कुटुंबांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंब या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यासाठी उत्पन्नाची अशी अट निर्धारित केली गेली नाही आहे त्यामुळे तुम्ही निश्चित होऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्या गावात,खेड्यात,दुर्गम भागात शासनाद्वारे अद्याप वीज जोडणी झालेली नाही अशा अर्जदारास प्राधान्य दिले जाते.

      Reply

Leave a Comment