राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी ऊस तोडणी यंत्राच्या किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येते.
राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांचा शेती क्षेत्रात विकास व्हावा तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवित असते.
देशातल्या साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश साखरेचे उत्पादन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात होते. त्यामुळे ऊस शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते परंतु विविध शैक्षणिक सुविधा, मजुरांना इतर क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या नवनवीन संधी, जीवनशैलीतील बदल तसेच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावल्यामुळे दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे. ऊस तोडणीस उशीर झाल्यास साखरेच्या उताऱ्यावर याचा मोठा परिणाम होतो व उसाला कमी भाव मिळतो तसेच ऊस तोडणीच्या टप्प्यात कुशल मजूर उपलब्ध न झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
उसाच्या क्षेत्रामध्ये व उसाच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत चालली आहे व अपुऱ्या मनुष्यबळामुळे साखर कारखान्यांना सतत ऊसतोडीची समस्या निर्माण होत असते.त्यामुळे राज्यातील शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात अजून सुद्धा ऊस तोडणी ही जुन्या पद्धतीने हाती केली जाते ज्यामध्ये पुष्कळ मजुरांची आवश्यकता असते व ही वेळ खाऊ पद्धत आहे. व यासाठी खर्च देखील जास्त येतो. ऊस पिकाच्या तोडणीमध्ये वेळेवर ऊस तोंडाला जाणे आवश्यक आहे कारण ऊस तोडणीला उशीर झाल्यास साखरेच्या उताऱ्यावर याचा मोठा परिणाम होतो व त्यामुळे शेतकऱ्यांना त्या उसाला कमी भाव मिळतो त्यामुळे अहोरात्र मेहनत करून शेतकऱ्यांना ऊस तोडणी वेळेवर ना झाल्यास मोठा आर्थिक फटका बसतो यासाठी शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे खाजगी साखर कारखाने ऊस तोडणीसाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करत आहेत त्यामुळे त्यांना कमी खर्चात वेळेवर ऊस तोडणी शक्य होते त्यामुळे पारंपारिक पद्धतीने ऊस तोडणी करणारे वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणीसाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही.
ऊस तोडणी यंत्राच्या किंमती खूप महाग आहेत. व आपला शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अथवा साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करणारे परवडणारे नाही. त्यामुळे ऊस तोडणी सारख्या मोठ्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेचे नाव | ऊस तोडणी यंत्र ट्रॅक्टर |
लाभ | 35 लाख रुपये |
उद्देश्य | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक अनुदान देणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील वैयक्तिक शेतकरी उद्योजक (Entrepreneur) सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था (FPO) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना ऊस तोडणी कमी खर्च वेळेवर करणे शक्य व्हावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे.
- शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- ही योजना राज्यस्तरीय असल्यामुळे राज्यातील सर्व वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- ऊस पिकाशी संबंधित राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- लाभाची राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात PFMS च्या सहाय्याने जमा केली जाईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40 टक्के अथवा रुपये 35 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल इतके अनुदान देण्यात येईल.
- योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा 60 टक्के व राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के राहील.
योजनेअंतर्गत अर्ज शुल्क:
- ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना 23/- रुपये अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाची आहे.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील शेतकरी, सहकारी साखर कारखाने, व्यक्ती अथवा त्यांचा समुह गट व स्वयंसहायता गट (एसएचजी) हे या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र राहतील.
योजनेचा फायदा:
- या योजनेअंर्तगत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.
- शेतकऱ्यांना शेतात आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करणे शक्य होईल.
- शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- या योजनेमुळे राज्याचा औद्योगीक विकास होईल.
योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी:
- वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांना एका कुटूंबातील एका व्यक्तीस फक्त एकदाच आणि फक्त एकच ऊस तोडणी यंत्राचा लाभ दिला जाईल.
- शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना एका संस्थेस एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान दिले जाईल.
- सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त ३ ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान दिले जाईल.
- योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना यंत्र किंमतीच्या 40 टक्के अथवा रुपये 40 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल इतके अनुदान देण्यात येईल व लाभार्थ्याला किमान 20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे व उर्वरीत रक्कम ही कर्ज स्वरूपाने उभे करण्याची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थ्याची असेल.
- ऊस तोडणी यंत्राची परिवहन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे व त्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित उत्पादक / विक्रेता व लाभार्थी यांची असेल.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच कुटुंबातील इतर सदस्याचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
- योजनेअत्नर्गत लाभार्थ्याला दिल्या गेलेल्या ऊस तोडणी यंत्रावर योजनेचे नाव, लाभार्थीचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम इ. तपशील कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात नोंदविणे आवश्यक राहील.
- लाभार्थीने त्यांस मंजूर झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील, अपवादात्मक परिस्थितीत त्याच प्रकारचे यंत्र अवजार लाभार्थी दुसऱ्या कंपनीचे खरेदी करू इच्छित असेल तर अशा बदलास सहसंचालक (विकास) यांची लेखी संमती आवश्यक राहील.
- अर्जाची नोंदणी झाल्यानंतर प्राप्त अर्जांतून लाभार्थ्याची निवड संगणकीय सोडत (Computerized Lottery) पद्धतीने केली जाईल व याबाबत लघुसंदेशाद्वारे ( SMS ) संबंधितास कागदपत्रे अपलोड करणाबाबत कळविण्यात येईल. नोंदणी करताना 7/12 व 8अ उतारा, आधार कार्ड व आधार लिंक बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी. सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी.
- कागदपत्रे सादर करणे : संगणकीय सोडतीत निवड झालेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या बाबीसाठी त्यांनी महा डीबीटी पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने ऊस तोडणी यंत्राचे दरपत्रक (Quotation) व केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या संस्थेचा वैध तपासणी प्रमाणपत्र / अहवाल ही कागदपत्रे विहित मुदतीत अपलोड करावीत. जे अर्जदार विहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड करणार नाहीत त्यांची निवड रद्द होईल. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन केली असल्यामुळे संगणकीय सोडतीनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांशिवाय इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करू नयेत.
- प्राप्त अर्ज व त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्याकरिता महा डीबीटी पोर्टलमध्ये साखर आयुक्तालय स्तरावर कक्ष (Desk ) निर्माण केलेला आहे.
- छाननीमधे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती पत्र निर्गमित करण्यात येईल. सदर पूर्वसंमती पत्रे अर्जदारांना त्यांच्या महा डीबीटी पोर्टलवरील खात्यामध्ये (Login) उपलब्ध होतील.
- पूर्वसंमती पत्र मिळालेल्या लाभार्थ्यांनी पूर्वसंमती पत्र दिलेल्या दिनांकापासून तीन (३) महिन्याचे आत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करावी. यंत्र खरेदी केल्यानंतर अनुदान मागणी करिता ऊस तोडणी यंत्र खरेदीचे बील (Tax Invoice), परिवहन विभागाकडील नोंदणी प्रमाणपत्र / नोंदणी करिता अर्ज केल्याची पावती ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. जर लाभार्थीने पूर्वसंमती मिळाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्यात यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांची निवड रद्द करणेत येईल.
- ऊस तोडणी यंत्राची भौगोलिक स्थान निश्चितीची (Geotagging ) (जेथे कार्यरत असेल तेथे) प्रत्यक्ष मोका तपासणी प्रादेशिक सहसंचालक (साखर) त्यांचे अधिनस्त अधिकारी यांचे मार्फत करतील व त्यानंतर परिशिष्ट-३ प्रमाणे मोका तपासणी प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी अपलोड करावे. तद्नंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून लाभार्थीना अनुदान वितरणाची कार्यवाही करणेत येईल.
- संगणकीय सोडतीत निवड झालेल्या अर्जदारांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) त्यांचे निवडीबाबत अवगत करण्यात येईल. सदर सोडतीत ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नसेल त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात येईल. प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची संबंधीत आर्थिक वर्षांत निवड न झाल्यास ते त्या आर्थिक वर्षात प्रतिक्षा यादीत राहतील आणि ते लाभार्थी पुढील वर्षी देखील (योजना कालावधीत) त्याच अर्जाच्या आधारे निवडीस पात्र राहतील. सदर घटकाकरीता त्यांनी पुनश्चः अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम केले जाणार आहे अर्जासोबत त्या कारखान्याचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
- कारखाना/ व्यक्तीगत लाभार्थी यांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी संपेपर्यंत करणे बंधनकारक आहे.
- केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थांकडून तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रांसाठीच अनुदान देण्यात येईल.
- ऊस तोडणी यंत्राची निवड करण्याची जबाबदारी संबंधित साखर कारखाना अथवा लाभार्थ्यांची असेल.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्र राज्यात करणे आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राचा वापर राज्याच्या बाहेर इतर राज्यात करता येणार नाही तसे करताना संबंधित लाभार्थी आढळून आल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाईल व अनुदानाची राशी वसूल केली जाईल.
- ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीनंतर ऊस तोडणी यंत्रास काम मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी यंत्र खरेदीदाराची असेल त्यासाठी राज्य शासनाद्वारे कुठल्याच प्रकारची मदत केली जाणार नाही.
- ऊस तोडणी यंत्र चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठादाराची असेल. त्यामुळे प्रशिक्षणाची खात्री करुनच खरेदीदाराने यंत्राची निवड करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीवर अनुदान मिळवले असल्यास अशा अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राची किमान 6 वर्ष विक्री/ हस्तांतरण करता येणार नाही तसे आढळल्यास लाभार्थ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व देण्यात आलेली अनुदानाची रक्कम वसूल केली जाईल.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- रेशन कार्ड
- बँक खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनीचा 7/12 व 8अ उतारा
- प्रतिज्ञापत्र
- ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
- बंधपत्र
- सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा
- अर्जदाराला सर्वात प्रथम ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- होम पेज वर गेल्यावर अर्जदाराला स्वतःची नोंदणी करायची आहे.
दुसरा टप्पा
- अर्जदाराला त्याच्या Username आणि Password च्या सहाय्याने लॉगिन करायचे आहे.
तिसरा टप्पा
- लॉगिन झाल्यावर अर्जदाराला शेतकरी योजना वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये अर्ज करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण च्या समोर बाबी निवड वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरण्याची आहे आणि जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर परत पहिले पेज उघडेल त्यामध्ये अर्ज करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये पहा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये प्राधान्य क्रम मध्ये 1 निवडून टिक करून अर्ज सादर करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Make Payment बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर पैसे भरण्याचे विविध पर्यायात दिसतील त्यामधील तुमच्या सोयीप्रमाणे पैशाचा भरणा करायचा आहे. पैशाचा भरणा केल्यावर तुम्हाला Receipt ची प्रिंट काढायची आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
ऊस तोडणी यंत्र अनुदान अर्ज करण्यासाठी पोर्टल | Click Here |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना हेल्पलाईन नंबर | 022-61316429 |
ऊस तोडणी यंत्र अनुदान अर्ज शासन निर्णय | Click Here |