मुलींचे शिक्षण, मुलींचे आरोग्य तसेच मुलींचे लग्न तसेच तिच्या उज्वल भविष्यासाठी कमी गुंतवणुकीची हि एक एक बचत योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना राज्यातील नवजात कन्येच्या पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते तसेच सुकन्या समृद्धी योजना विशेष करून मुलींसाठी सुरु केली गेली असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणुकीची एक बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत आपल्या क्षेत्रातील कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा डाक कार्यालयात मुलीचे नावे सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.
योजनेचा मुदत कालावधी 21 वर्ष निर्धारित केला गेला आहे त्यामुळे खाते सुरु केल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासह मुलीच्या पालकांना दिली जाते.
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी तसेच मुलगी एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यास तिच्या उपचारासाठी जमा रकमेतून 50 टक्के रक्कम काढता येते व उर्वरित रक्कम मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत काढता येते परंतु मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर जर मुलीचे लग्न झाले तर अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करण्यात येते.
या योजनेचा मुदत कालावधी जरी 21 वर्ष निर्धारित केला गेला असली तरी मुलीच्या पालकांना मुलीचे वय 14 वर्ष पूर्ण होईपर्यंतच खात्यात रक्कम जमा करण्याची गरज असते व 15 वर्ष ते 21 वर्ष खात्यात पैसे जमा करण्याची आवश्यकता नसते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये दरवर्षी सुकन्या सम्रुद्धी खात्यातमध्ये किमान 250/- रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते व खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेची म्यॅच्युरिटी होते व त्यानंतर योग्य व्याजदराने संपूर्ण रक्कम मुलींच्या आई वडिलांना दिली जाते ज्याचा उपयोग मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच मुलीच्या लग्नासाठी तसेच मुलीला एखादा आजार झाल्यास तिच्या औषध उपचारासाठी करता येतो. त्यामुळे पालकांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची गरज नाही.
योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान 30,000/- रुपये ते 75,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींचे आरोग्य, त्यांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून त्यांचे जीवनमान सुधारणे.
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
लाभार्थी | देशातील सर्व राज्यातील 10 वर्षाखालील मुली |
लाभ | आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | मुलींचे भविष्य उज्वल बनविणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यात मुलीचे जन्मप्रमाणं वाढावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- भ्रूणहत्या थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- समाजात मुलींबद्दल असलेला नकारात्मक विचार बदलून मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे.

योजनेचे वैशिष्ट्य:
- सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे तसेच या योजनेला भारत सरकार चे पाठबळ असल्याकारणामुळे या योजनेत पालकांना कुठलीच काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- सुकन्या समृद्धी खाते कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट कार्यालयात उघडता येते तसेच खाते एका बँकेतून तसेच पोस्ट कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ट्रान्सफर करता येते.
- या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना या नावाने देखील ओळखता येते.
- मुलींच्या शिक्षणासाठी तसेच मुलींच्या विवाहासाठी सुकन्या सम्रुद्धी योजना फायद्याची ठरते.
- सुकन्या समुद्धी योजना भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली 100 टक्के सुरक्षित योजना आहे.
योजनेअंतर्गत मुदत ठेव कालावधी:
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडल्यापासून तिचे वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुदत ठेव कालावधी आहे तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी 21 वर्ष असला तरीही सुरवातीच्या फक्त 14 वर्षापर्यंतच मुलीच्या आई वडिलांना खात्यात पैसे जमा करायचे असतात.
योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर:
- तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर करते त्यानुसार सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत व्याजदर आकारला जातो.
सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर
Year | Opening Balance | Deposit | Interest | Closing Balance |
1 | 0 | 5000 | 380 | 5380 |
2 | 5380 | 5000 | 789 | 11169 |
3 | 11169 | 5000 | 1229 | 17398 |
4 | 17398 | 5000 | 1702 | 24100 |
5 | 24100 | 5000 | 2212 | 31312 |
6 | 31312 | 5000 | 2760 | 39071 |
7 | 39071 | 5000 | 3349 | 47421 |
8 | 47421 | 5000 | 3984 | 56405 |
9 | 56405 | 5000 | 4667 | 66071 |
10 | 66071 | 5000 | 5401 | 76473 |
11 | 76473 | 5000 | 6192 | 87665 |
12 | 87665 | 5000 | 7043 | 99707 |
13 | 99707 | 5000 | 7958 | 112665 |
14 | 112665 | 5000 | 8943 | 126607 |
15 | 126607 | 0 | 9622 | 136230 |
16 | 136230 | 0 | 10353 | 146583 |
17 | 146583 | 0 | 11140 | 157723 |
18 | 157723 | 0 | 11987 | 169710 |
19 | 169710 | 0 | 12898 | 182608 |
20 | 182608 | 0 | 13878 | 196487 |
21 | 196487 | 0 | 14933 | 211420 |
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 5,000/- रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 1,26,607/- इतकी रक्कम मिळेल तर 21 वर्षाला एकूण 2,11,420/- रुपये मिळतील.
तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला 21 वर्षानंतर मिळेल.
योजनेअंतर्गत बँकांची यादी:
- बँक ऑफ महाराष्ट्र
- आईसीआईसीआई बँक
- स्टेट बँक ऑफ मैसूर
- स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया
- यूनियन बँक ऑफ इंडिया,
- यूको बँक
- स्टेट बँक ऑफ पटियाला
- इंडियन बँक
- आईडीबीआई बँक
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बड़ौदा
- एक्सिस बँक
- आंध्रा बँक
- इलाहाबाद बँक
- भारतीय स्टेट बँक
- इंडियन ओवसीज बँक
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
- विजया बँक
- सिंडिकेट बँक
- पंजाब नेशनल बँक
- पंजाब एंड सिंध बँक
- ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स
- देना बँक
- कॉर्पोरेशन बँक
- सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
- केनरा बँक
योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी:
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत फक्त 10 वर्षाखालील मुली लाभ घेऊ शकतात.
- एका कुटुंबातील फक्त २ मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल व कुटुंबातील तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मातेच्या दुसऱ्या प्रसूती दरम्यान जुळ्या मुलींना जन्म दिल्यास अशा परिस्थितीत त्या दोन्ही जुळ्या मुलींना सुकन्या सम्रुद्धी योजनेचा लाभ दिला जाईल.
- सुकन्या समृद्धी खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक द्वारे रक्कम भरता येईल.
- मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या समृद्धी योजना म्यॅच्युअर होते त्यामुळे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर खात्यातील जमा रक्कम व्याजासहित पालकांच्या स्वाधीन केली जाते.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचे शिक्षण व आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी खात्यामधून 50% रक्कम काढता येईल.
खालील परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करता येईल:
- लाभार्थी मुलीच्या पालकाचा एकाएकी मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- सुकन्या समृद्धी खाते उघडून 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आई वडिलांना सदर खाते बंद करता येईल त्यासाठी कुठल्याही कारणाची आवश्यकता लागत नाही.
- लाभार्थी मुलीला एखादा आजार झाल्यास जमा रक्कम व्याजासहित काढून सदर खाते बंद करता येईल.
पैसे कधी काढू शकतात:
- मुलीच्या 18 वर्षांनंतर ती तिच्या खात्यातील 50% रक्कम काढू शकते.
- लग्नानंतर रक्कम काढू शकते.
- शिक्षणासाठी मुली अर्ज करू शकतात.
योजनेचे लाभार्थी:
- प्रत्येक राज्यातील सर्व जाती, धर्मातील मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवता येईल.
- अनाथ तसेच दत्तक घेतलेल्या मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचा फायदा:
- राज्यातील मुलीचे भविष्य उज्वल बनविण्याच्या दृष्टीने सुकन्या समृद्धी योजना लाभदायी आहे.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे भविष्य सुरक्षित होते.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे मुलींना त्यांचे शिक्षण,आरोग्य तसेच लग्नासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता लागत नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही.
- देशातील सर्व जाती व धर्मातील मुली या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
- देशातील प्रत्येक पोस्ट खात्यात तसेच बँक खात्यात हि योजना उपलब्ध आहे व त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व बँक व पोस्ट खात्यात मिळवता येतो.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.
- या योजनेची मुदत कालावधी जरी 21 वर्ष असली तरी पालकांना फक्त 14 वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात व मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत पैसे भरण्याची गरज लागत नाही.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवर लाभार्थी मुलीला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत चांगला व्याजदर मिळतो.
- भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली हि एक कमी गुंतवणूक असलेली बचत योजना आहे.
- केंद्र सरकार द्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे या योजनेवर केंद्र सरकार चे लक्ष्य असते व सरकार कडून पैशाची हमी घेतली जाते त्यामुळे या योजनेमध्ये पैसे बुडण्याची शकता नाही.
- कर लाभ: सुकन्या समृद्धि योजनेवरील जमा रक्कम आणि व्याज करमुक्त आहे.
- उच्च व्याज दर: सध्याच्या व्याज दरावर 8.6% व्याज दिले जाते.
- सुरक्षित गुंतवणूक: ही योजना सरकारद्वारे समर्थित आहे, म्हणूनच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतातील मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार कन्या राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना त्यांच्या राज्यात जाऊन अर्ज करावा लागेल.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे.
- मुलीच्या जन्मापासून मुलीचे वय 10 वर्ष होण्याअगोदर सुकन्या समृद्धी खाते उघडणे आवश्यक आहे.
- मुलीचे वय 10 वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते उघडता येणार नाही.
- फक्त मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- मुलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर जर मुलीचे लग्न झाले तर अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी खाते बंद करण्यात येईल.
- मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या समृद्धी योजना ची म्यॅच्युरिटी होते परंतु लाभार्थ्याने खाते बंद न केल्यास जमा रकमेवर बँक व पोस्ट खात्याच्या चालू व्याज दराने व्याज दिला जातो.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच तिच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या औषोधोपचारासाठी जमा रकमेतून 50 टक्के रक्कम काढता येईल व उर्वरित रक्कम मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना मराठी अंतर्गत दरवर्षी खात्यात किमान 250/- रुपये जमा करणे आवश्यक आहे परंतु काही कारणास्तव खात्यात पैसे जमा केले गेले नाही तर अशा परिस्थितीत सदर खाते बंद करण्यात येईल व खाते पुन्हा सुरु करण्यासाठी दरवर्षी 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरु करता येईल.
- लाभार्थी मुलीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास खात्यावरील जमा रक्कम व्याजासहित मुलीच्या आई वडीलांना देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
सदर योजनेअंतर्गत मुलगी लहान असल्याकारणामुळे तिची कागदपत्रे उपलब्ध नसल्यास मुलीच्या आई वडिलांची जमा करण्यात येतील व जेव्हा मुलीची कागदपत्रे तयार होतील तेव्हा मुलीची कागदपत्रे जमा करावी लागतील.
- सुकन्या समृद्धी योजना अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला (वीज बिल, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, घरपट्टी, टेलीफोन बिल)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मुलीचा जन्माचा दाखला
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार मुलगी कुटुंबातील तिसरी मुलगी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- मुलीचा मृत्यू झाल्यास सुकन्या समृद्धी खाते बंद केले जाईल.
- दुसऱ्या राज्यातील मुलीने अर्ज केला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडायची पद्धत:
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडायची आहेत आणि भरलेला अर्ज बँकेत जमा करायचा आहे.
- त्यानंतर बँक कर्मचारी आपल्या अर्जाची व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील आपल्या सोयीनुसार आपण हि रक्कम वाढवू शकता ज्याची कमाल मर्यादा दरवर्षी 1.5 लाख आहे.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला 14 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून खाते उघडायची पद्धत:
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून त्या अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी लागेल आणि सदर अर्ज पोस्टात जमा करावा लागेल.
- पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून तुमच्या अर्जाची तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील आपल्या सोयीनुसार आपण हि रक्कम वाढवू शकता ज्याची कमाल मर्यादा दरवर्षी 1.5 लाख आहे.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला 14 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज करता येईल.
Telegram Group | Join |