स्वाधार योजना माहिती मराठी : Swadhar Yojana

स्वाधार योजना माहिती मराठी: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी निरंतर प्रयत्नात असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते.
आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव स्वाधार योजना आहे.

राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतर च्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृहे यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात जे त्यांना अशक्य असते या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11वी व त्या पुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.

Table of Contents

स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील.
राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.

दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात झालेली वाढ तसेच राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी/12वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे. [स्वाधार योजना माहिती मराठी]

वाचकांना विनंती

आम्ही स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी असतील जे दुसऱ्या शहरात जाऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

योजनेचे नावस्वाधार योजना माहिती मराठी
राज्यमहाराष्ट्र
विभागसमाज कल्याण विभाग
लाभार्थीअनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
उद्देशविद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना उद्देश

 • राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे
 • विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे
 • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
 • स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे
 • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
 • दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. [स्वाधार योजना माहिती मराठी]
स्वाधार योजना माहिती मराठी

स्वाधार योजना माहिती मराठी चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र शासनाद्वारे स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • समाज कल्याण विभागाद्वारे स्वाधार योजना राबविली जाते
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी ज्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना फायद्याची ठरणार आहे.
 • राज्यातील आर्थिक दृष्ठ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी हि योजना महत्वाची ठरणार आहे.
 • स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्ज करताना विद्यार्थ्यांना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये.
 • स्वाधार योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल. [स्वाधार योजना माहिती मराठी]
 • स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते आहे त्यासाठी वाचा प्रशिक्षण योजना

स्वधार योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान

dr babasaheb ambedkar swadhar yojana anudan

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.

मुंबई शहर, मुंबई उपनगर,
नवी मुंबई, ठाणे, पुणे,
पिंपरी चिंचवड, नागपूर
या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
महसूल विभागीय शहर व
क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
उर्वरित शहरात उच्च शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता
(वार्षिक)
32000/- रुपये28000/- रुपये25000/- रुपये
निवास भत्ता
(वार्षिक)
20000/- रुपये15000/- रुपये12000/- रुपये
निर्वाह भत्ता
(वार्षिक)
8000/- रुपये8000/- रुपये6000/- रुपये
एकूण
(वार्षिक)
60000/- रुपये51000/- रुपये43000/- रुपये

वरील रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील/विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000/- रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.

स्वाधार योजना माहिती मराठी 2024

 • अपुर्ण भरलेले अर्ज आणी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
 • 60% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.
 • जिल्हा निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असुन त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
 • निवड यादी संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली जाईल निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. [स्वाधार योजना माहिती मराठी]

स्वाधार योजनेचा निकष

 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करतील.
 • सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छानणी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे जिल्हयातील जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहांशी संलग्न (attach) करतील.
 • सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पध्दतीने या योजने साठी अर्ज करावा लागेल.

स्वाधार योजनेचे लाभार्थी

 • अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील दुसऱ्या शहरात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

स्वाधार योजनेचा लाभ

 • दुसऱ्या राज्यात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक विषयाचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता दिला जातो,
 • स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी स्वाधार योजनेच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
 • स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही.
 • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
 • स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकतील व राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतील व राज्याचा आर्थिक विकास करू शकतील.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होईल. [स्वाधार योजना माहिती मराठी]

स्वाधार योजना अंतर्गत लाभाचे वितरण

 • विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादर करतील व संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
 • DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS पध्दतीने त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांने संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.
 • जे विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.
 • विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. [स्वाधार योजना माहिती मराठी]

स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा
 • अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील असावा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अटी व शर्ती

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातील.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
 • विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
 • इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.
 • इयत्ता 12वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
 • दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
 • इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
 • स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.
 • अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
 • विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
 • अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
 • अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
 • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
 • विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
 • लाभार्थी विद्यार्थ्याने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल
 • प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
 • सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
 • विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
 • या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल. [स्वाधार योजना माहिती मराठी]
 • सरकार चर्मकार समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा बीज भांडवल योजना
 • देशात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी सरकार देत आहे 20 लाखांपर्यंत कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना

स्वाधार योजना कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मागील वर्षातील गुणपत्रिका
 • मोबाईल क्रमांक
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट साईज फोटो
 • विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमाणपत्र
 • बँक खात्याचा तपशील
 • उत्पन्नाचा दाखला
 • जातीचा दाखला
 • जन्माचा दाखला
 • शपथपत्र

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
 • कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालय जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [स्वाधार योजना माहिती मराठी]
Telegram GroupJoin
स्वाधार योजना शासन निर्णयClick Here
स्वाधार योजना अर्जClick Here
Swadhar Yojana Documents List In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रांची यादी मराठीत
Click Here

स्वाधार योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

स्वाधार योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

स्वाधार योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

स्वाधार योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील अनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

स्वाधार योजनेचा लाभ काय आहे?

स्वाधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय केले जाते ज्यामध्ये निर्वाह भत्ता, भोजन भत्ता तसेच निवास भत्ता समाविष्ट आहे.

स्वाधार योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील अनुसूचित जात तसेच नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांचे सामाजिक तसेच शैक्षणिक विकास करणे

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा लागेल?

स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभाग कार्यालयात अर्ज करावा लागेल.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे स्वाधार योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

12 thoughts on “स्वाधार योजना माहिती मराठी : Swadhar Yojana”

 1. स्वाधार योजनेचा एकदा अर्ज भरल्यानंतर दुसऱ्यांदा जर मुदत निघून गेली/भरता आला नाही तर तिसऱ्यांदा आपल्याला भरता येईल का कृपया मार्गदर्शन करावे

  Reply
  • जर मुदत निघून गेली आणि काही कारणास्तव तुम्हाला अर्ज भरता आला नाही तर अशा परिस्थिती तुम्ही तिसऱ्यांदा अर्ज करू शकता.

   Reply
 2. स्वाधार योजनेसाठी गॅप ३ वर्षाचा असेल तर संबंधित विद्यार्थ्याला लाभ मिळत नाही असे म्हणत आहेत कृपया मार्गदर्शन् करावे…

  Reply
  • जर एखाद्या विद्यार्थ्याला गॅप असेल तर वकिलामार्फत ऍफिडेव्हिट बनवून अर्जासोबत सादर करावे.

   Reply
 3. मी B A 1St year ला स्वाधार योजनेचा लाभ घेतला आहे,आणि आता मी बा च ऍडमिशन रद्द करून BCA ला ऍडमिशन केलं आहे तर मी फॉर्म भरू शकतो का

  Reply
 4. माझ कॉलेज समाज कल्याण कार्यालय पासुन 25 किमी दूर आहे मी अर्ज करू शकतो का

  Reply
 5. माझ्या मुलीचेकॉलेज उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 50किमी दूर आहे
  ती या योजनेत फॉर्म भरू शकते का?

  Reply

Leave a Comment