प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना : केंद्र सरकार देशातील नागरीकांच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते.
आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आहे.
जळाऊ लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादीं स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत असतो त्याला आला घालण्यासाठी व देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान यांच्याद्वारे 1 मे 2016 रोजी उज्वला गॅस योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर चे कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते म्हणजेच लाभार्थ्याला गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठी कुठल्याच प्रकारची अनामत रक्कम जमा करावी लागणार नाही तसेच लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 सिलेंडर च्या रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 200/- रुपये अनुदान दिले जाते व ही अनुदान राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देणे तसेच महिला सशक्तीकरणाला चालना देणे,त्यांची सुरक्षा करणे व चुलीच्या धुरापासून मुक्तता करून त्यांच्या आरोग्य अबाधित राखणे.
नवीन शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2023 पासून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर एकूण 400/- रुपयांची सब्सिडी दिली जाते आहे
योजनेचे नाव | उज्वला गॅस योजना |
उद्देश | नागरिकांना एलपीजी च्या वापरासाठी प्रोत्साहन देणे. |
योजनेचे लाभार्थी | ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
लाभ | मोफत गॅस कनेक्शन सोबत एक मोफत गॅस सिलेंडर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे उद्दिष्ट
- ग्रामीण भागात जीवाष्म इंधन ज्या जागी एलपीजी च्या वापरासाठी प्रोत्साहन देणे.
- चुलीच्या धुरापासून महिलांचे तसेच घरातील लहान मुलांचे रक्षण करणे तसेच धुरापासून होणाऱ्या श्वसनाच्या विविध आजारांपासून महिलांचे रक्षण करणे.
- देशातील प्रत्येक कुटुंबांना पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळवावे.
- देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस कलेक्शन उपलब्ध करून देणे.
- या योजनेचा उद्देश LPG कनेक्शन नसलेल्या 5 कोटी गरीब कुटुंबांना LPG कनेक्शन प्रदान करणे आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांव्यतिरिक्त, ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायातील पुरुषांनाही LPG कनेक्शनसाठी पात्रता आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन कुटुंबातील फक्त महिलेच्या नावावर दिले जाते.
- या योजनेअंतर्गत देशातील 8 करोड कुटुंबांना लाभ देण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.
- या योजनेअंतर्गत दरवर्षी 8 हजार करोड रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात येते.
- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटूंबांना विशेष करून महिलांना खूप दिलासा मिळाला आहे.
योजनेचा फायदा:
- मोफत LPG कनेक्शन: लाभार्थ्यांना LPG सिलेंडर आणि स्टोव्ह सह मोफत LPG कनेक्शन दिले जाते.
- सबसिडी: पहिल्या 12 सिलेंडरवर ₹100 प्रति सिलेंडर सबसिडी मिळते.
- सुरक्षित आणि स्वच्छ इंधन: LPG हे लाकूड आणि शेणखत यांच्यासारख्या पारंपारिक इंधनांपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित इंधन आहे.
- आरोग्याचे फायदे: LPG मुळे होणाऱ्या वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या कमी होतात.
- महिला सशक्तीकरण: या योजनेमुळे महिलांना घरात निर्णय घेण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची शक्ती मिळते.
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ:
उज्वला गॅस योजना अंतर्गत कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.
14.2 किलो सिलेंडरसाठी 1600/- रुपये व 5 किलो सिलेंडरसाठी 1150/- रुपये यात खालील बाबींचा समावेश आहे.
सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव | 14.2 किलो सिलेंडरसाठी 1250/- रुपये व 5 किलो सिलेंडरसाठी 800/- रुपये |
प्रेशर रेग्युलेटर | 150/- रुपये |
एलपीजी नळी | 100/- रुपये |
घरगुती गॅस ग्राहक कार्ड | 25/- रुपये |
तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क | 75/- रुपये |
याव्यतिरिक्त, सर्व प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील. |
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- सेक्शन 11 च्या अंतर्गत लाभार्थी यादीमधील महिला.
- वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब (बीपीएल)
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / बौद्ध / मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
- अति मागासवर्गीय (एमबीसी)
- अंत्योदय अन्न योजना (एएवाय)
- चहा आणि माजी चहा बाग जमाती
- वनवासी
- बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी
- एसइसीसी कुटुंबांतर्गत (एएचएल टिन) किंवा 14-कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले
- देशातील दुर्गम भाग जिथे लोकांना जेवण बनवण्यासाठी गॅस कनेक्शन उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते अशा महिलांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता आणि अटी:
- कुटुंबातील फक्त महिलेच्याच नावावर गॅस सिलेंडर ची नोंदणी केली जाईल.
- अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
- अर्जदाराच्या नावावर ह्या आधी कधी गॅस कनेक्शन घेतले गेलेले नसावे किंवा घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असता कामा नये.
- जर अर्जदार इतर कोणत्या राज्याचा रहिवाशी असल्यास त्याला Self Declaration Form भरावा लागेल त्याला रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत द्यायची गरज नाही.
- अर्जदार महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महिला बीपीएल (BPL) कुटूंबातील असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- टेलिफोन/वीज/पाणी बिल
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
- अर्जदार महिलेच्या बँक खात्याचे तपशील झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- उज्वला गॅस योजना साठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्याला क्षेत्रातील जवळच्या गॅस वितरण केंद्रात जावे लागेल व प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल .
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी लागेल व सदर भरलेला अर्ज गॅस वितरण केंद्रात जमा करावा.लागेल.
- गॅस वितरण केंद्राकडून सदर भरलेला अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून गॅस वितरक तुम्हाला उज्वला उज्वला गॅस योजनेच्या लाभासाठी मंजुरी देण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अधीकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील उपलब्ध गॅस कंपनीची ( Indane/Bharatgas/HP Gas) निवड करावी लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला नवीन जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Type of Connection मध्ये Ujjwala 2.0 New Connection निवडावे लागेल तसेच राज्य मध्ये महाराष्ट्र आणि जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे आता तुम्हाला यादी पहा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या जिल्हयातील गॅस वितरकांची यादी दिसेल त्यामधील तुमच्या घराजवळील गॅस वितरकांची निवड करायची आहे आणि पुढे चालू वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाईल वर आपण उज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा एक Text Message येईल.
- काही दिवसांनी आपण निवडलेल्या गॅस वितरण केंद्रातून आपल्याला फोन येईल आणि आपल्याला आपल्या कागदपत्रांच्या पडताळणी साठी बोलावले जाईल त्या नंतर प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत आपल्या घरी गॅस कनेक्शन येईल.
Telegram Group | Join |
PMUY Official Website | Click Here |
Ujjwala Helpline | 1800-266-6696 |
Toll Free Number | 1800-233-3555 |
PMUY Application Form | Click Here |
PMUY Pre Installation Check Form | Click Here |
PMUY self Declaration Form | Click Here |
PMUY Supplementary KYC Form | Click Here |
महाराष्ट्रात उज्ज्वला योजनेचा फायदा:
- महाराष्ट्रात या योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- 2024 पर्यंत, महाराष्ट्रात 1 कोटींहून अधिक महिलांना LPG गॅस कनेक्शन दिले गेले आहेत.
- योजनेमुळे राज्यातील अनेक गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन मिळण्यास मदत झाली आहे.