वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तिला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तिला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.
राज्यात बहुतांश नागरिक हे ग्रामीण भागात राहतात ग्रामीण भागात नागरिकांच्या आजू बाजूला वन्य प्राण्याचा वावर असतो. त्यामुळे नागरिक शेतात काम करताना किंवा कामानिमित्त बाहेर जाताना त्यांच्यावर वन्य प्राणी हल्ला करतात व जखमी करतात. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगात असतात त्यामुळे वन्य प्राण्याच्या हल्य्यात जखमी झाल्यामुळे औषोधोपचारासाठी त्यांच्याजवळ पुरेशे पैसे नसतात तसेच काही वेळा प्राण्याच्या या हल्ल्यामुळे मनुष्याचा मृत्यू देखील होतो व घरातील कमावती व्यक्तीच्या अशा एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांना खूप साऱ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात नागरिकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे व्यक्ती मृत / अपंग / जखमी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती शासन निर्णयप्रमे कायम राहिल.
योजनेचे नाव | वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | वन विभाग |
लाभार्थी | राज्यातील नागरिक |
लाभ | 25 लाखाचे अर्थ सहाय्य |
उद्देश्य | औषोधोपचारासाठी अर्थसहाय्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
वन्य प्राणी नुकसान भरपाई योजना चे उद्दिष्ट
- राज्यातील नागरिकांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- वन्य प्राण्याच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना उपचारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्यास त्याला औषोधोपचारासाठी किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अर्थ सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे नागरिक घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यामुळे त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही व त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
वन्यप्राणी हल्ला नुकसानभरपाई योजना अंतर्गत अर्थ सहाय्य
वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्य्यात मनुष्यहानी झाल्यास खालील प्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात देण्यात येईल.
तपशील | देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम |
व्यक्ती मृत झाल्यास | 25 लाख रुपये (पंचवीस लाख फक्त) |
व्यक्ती कायम स्वरूपी अपंग झाल्यास | 7.50 लाख रुपये (साडेसात लाख फक्त) |
व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास | 5 लाख रुपये (पाच लाख फक्त) |
व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास | औषध उपचारासाठी येणार खर्च देण्यात येईल. मात्र खाजगी रुग्णालयात औषोधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा 50,000/- रुपये प्रति व्यक्ती अशी राहील. |
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी 10,00,000/- रुपये (दहा लाख फक्त) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम 10,00,000/- (दहा लाख फक्त) 5 वर्षाकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील आणि उर्वरित 50,000/- रुपये (पाच लाख फक्त) 10 वर्षाकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. व 10 वर्षानंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:
- मानवी जीवितहानी: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 10 लाखांपर्यंत मदत.
- जखमी व्यक्ती: गंभीर जखमी व्यक्तींना ५ लाखांपर्यंत मदत.
- पशुधन मृत्यू: मृत पशुधनासाठी बाजारमूल्य किंवा 15000/- रुपयांपर्यंत मदत (ज्यापैकी कमी असेल).
- पशुधन जखमी: जखमी पशुधनासाठी उपचार खर्च आणि पशुधन अपंग झाल्यास 15000/- रुपयांपर्यंत मदत.
- पीक नुकसान: नुकसान झालेल्या पिकाच्या बाजारभावाच्या 75% पर्यंत मदत.
- मच्छिमारी साहित्य नुकसान: नुकसान झालेल्या मच्छिमारी साहित्यासाठी वास्तविक नुकसान भरपाई.
मनुष्य वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना अंतर्गत अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्थसहाय्य मिळवण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन कर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज केल्यानंतर वन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतील व त्यानंतर लाभ दिला जाईल.
- नागरिकांची एखाद्या प्राण्याची शिकार करताना किंवा एखाद्या क्रूर भावनेने प्राण्याला इजा पोचवताना त्या प्राण्याकडून त्या मनुष्यावर हल्ला झाल्यास अशा परिस्थितीत अर्थ सहाय्य दिले जाणार नाही.
वन्यप्राणी हल्ला नुकसानभरपाई योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- वन अधिकाऱ्यांचा दाखला
- मृत्यू दाखला
- शव विच्छेदन अहवाल
- FIR
अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम वन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- वन अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या अर्जाची व जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून त्या नंतर तुम्हाला लाभाची राशी वितरित केली जाईल.
अधिक माहितीसाठी:
अधिक माहितीसाठी आपण आपल्या राज्यातील वन विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
Telegram Group | Click Here |
वन्य प्राणी नुकसान भरपाई अर्ज | Click Here |
वन्य प्राणी नुकसान भरपाई gr | Click Here |