राज्यातील साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबीमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून वृद्ध कलावंत मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना प्रतिमहिना 3,150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
कलाकार हे त्यांच्या तारुण्यात विविध कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात व राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करत असतात परंतु जेव्हा त्यांचे वय होते त्यावेळेस त्यांना नागरिकांचे मनोरंजन करणे शक्य नसते तसेच त्यांना कुठल्याच प्रकारचे भविष्य निधी नसल्यामुळे वृद्ध काळात त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील वृद्ध कलाकारांच्या या सर्व समस्येचा विचार करून राज्य शासनाने वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत दरवर्षी 100 कलाकारांची निवड करण्यात येते व मानधन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार मानधन दिले जाते.
योजनेचे नाव | कलाकार मानधन योजना |
लाभार्थी | राज्यातील वृद्ध कलाकार |
लाभ | दरमहिना 3150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | वृद्ध कलाकारांना दरमहिना मासिक वेतन उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
कलाकार मानधन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- राज्यातील वृद्ध कलाकारांची त्यांच्या वृद्धोपकाळात हेळसांड होऊ नये या उद्देशाने वृद्ध कलाकार मानधन योजना ची सुरुवात करण्यात आली.
- वृद्ध कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- कला क्षेत्राला प्रोत्साहन देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- विधवा तसेच परितक्त्या वृध्द महिला कलाकारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी मानधन राशी लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- वुद्ध कलाकारांसाठी सुरु करण्यात आलेली जीवनदायी अशी हि एक योजना आहे.
- योजनेअंतर्गत जातीचा प्रवर्ग निश्चित केलेला नाही आहे त्यामुळे सदर योजना राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकारांना लागू आहे.
योजनेअंतर्गत दिले जाणारे मानधन:
वर्गवारी | मानधन दरमहिना | मानधन दरवर्षी |
अ वर्ग | 3,150/- रुपये | 37,800/- रुपये |
ब वर्ग | 2,700/- रुपये | 32,400/- रुपये |
क वर्ग | 2,250/- रुपये | 27,000/- रुपये |
योजनेअंतर्गत समाविष्ट कलाकार:
- भजनी
- किर्तनी
- गोंधळी
- आराधी
- तमाशा
- साहित्यिक
- गायक
- वादक
- कवी
- लेखक
- महिला
- विधवा
- दिव्यांग कलाकार
अर्जदार कलाकाराने अर्जासोबत जोडावयाचे काही पुरावे:
- साहित्य / कलाक्षेत्रातील कार्याचे पुरावे.
- प्रकाशित साहित्य / लेखनाची कात्रणे / कलावंतांच्या कार्यक्रमांची छायाचित्रे / वृत्तपत्रिय बातम्या / जाहिराती / आकाशवाणी अथवा दुरदर्शवरील कार्यक्रमाचे पुरावे / निमंत्रण | पत्रिका / प्राप्त प्रशस्ती पत्रकांची माहिती ज्यात अर्जदाराचा उल्लेख आहे अशा शासकीय अभिलेखाची सांक्षांकित प्रत
- केंद्र शासनाचा / राज्य शासनाचा / सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र.
- केंद्र / राज्य शासनाच्या साहित्य अकादमी / संगीत नाटक | अकादमी / राज्य शासनाचे साहित्य व सांस्कृतिक विषयक पुरस्कार / पश्चिम क्षेत्र किंवा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र / सांस्कृतिक कार्य संचालनालय / आकाशवाणी / दुरदर्शन / साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील | सहभागाचे पुरावे.
- जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या वाड्.मय विषयक अथवा | कला विषय नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र जोडावे.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील 50 वर्षावरील वृद्ध कलाकार
योजनेचा फायदा:
- या योजनेअंतर्गत राज्यातील वुद्ध कलाकारांना दरमहिना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
- वृद्ध काळात कलाकारांची हेळसांड होणार नाही.
- कलाकारांना वृद्ध काळात दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील कलाकारांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कलाकारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदाराने कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे काम केले असणे आवश्यक आहे.
- 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- क्षयरोग, कृष्ठरोग, अर्धांगवायु, कर्करोग या रोगांनी आजारी असलेल्या तसेच 40 टक्यापेक्षा जास्त शारिरिक व्यंग किंवा अपघातात 40 टक्यांपेक्षा जास्त अपंगत्वामुळे स्वत:चा व्यवसाय करु शकत नसलेल्या साहित्यिक व कलाकारांना वयाची अट राहणार नाही.
- प्रत्येक आर्थिक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापूर्वी संबंधित मान्यवर हयात असल्याबद्दलचा दाखला त्याच्याकडून उपलब्ध करून घेणे आवश्यक राहील.
- अर्जदार कलाकाराचे वार्षिक उत्पन्न 48,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये
- शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेणारी व्यक्ती या मानधन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
- अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसारमाध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कात्रणे व कला सादरीकरणाचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- विहित अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे इतके काम केल्याचे पुरावे
- रहिवाशी दाखला
- अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्न दाखला
- वयाचा दाखला
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- बँक खात्याचा तपशील
ऑनलाईन मोडणी करण्याची पद्धत:
पहिला टप्पा
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नवीन युजर येथे क्लिक करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला दोन पर्यंत दिसतील त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार पर्यायाची निवड करून विचारलेली सर्व माहिती भरून स्वतःची नोंदणी करा
- अशा प्रकारे तुमची नवीन नोंदणी पूर्ण होईल
दुसरा टप्पा
- अर्जदाराला होम पेज वर Search Box मध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना टाकून Search करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेची माहिती दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लागू करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याजवळ अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.
Telegram Group | Join |
वृद्ध कलाकार मानधन योजना पोर्टल | येथे क्लिक करा |
वृद्ध कलाकार मानधन योजना संपर्क | 1800-120-8040 |
Kalakar Mandhan Yojana Form Pdf | Click Here |