केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते व त्याचप्रमाणे राज्य सरकार सुद्धा देशातील नागरिकांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
आज आपण केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने देशात तसेच राज्यात स्वच्छता निर्माण करण्यासाठी राज्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव शौचालय अनुदान योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते यामध्ये केंद्र सरकारचा 75% वाटा (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) असतो.
ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व त्यांच्याजवळ उत्पन्नाचा तसेच रोजगाराचा स्थायी स्रोत उपलब्ध नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते त्यामुळे अशी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात व ते खुल्यावर शौचास बसतात व खुल्यावर शौचास बसल्यावर परिसरात घाण निर्माण होते व सर्वत्र दुर्गंधी पसरते व माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो व परिणामी परिसरात रोगराई पसरते व माणसे आजाराला बळी पडतात.
काही नागरिक नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्व घाण नदीत जाते व नदीचे पाणी दूषित होते व तेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात व दूषित पाणी प्यायल्यामुळे आजाराला बळी पडतात त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांच्या या समस्यांचा विचार करून त्यांची या सर्व समस्यांपासून सुटका करून त्यांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करण्याच्या उद्देशाने तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाला व राज्याला स्वच्छ बनविण्यासाठी तसेच नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी राज्यात शौचालय अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते व लाभाची रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते.
महाराष्ट्र शासनाची शौचालय अनुदान योजना 2024 अंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामीण आणि शहरी घरात स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून शौचालय बांधून स्वच्छ भारत निर्माण करणे हा उद्देश आहे.
योजनेचे नाव | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र |
विभाग | ग्राम विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
लाभ | शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य |
उद्देश | राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील दारिद्र्य रेषेखाली तसेच दारिद्र्य रेषेच्या वर जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करण्याच्या उद्देशाने शौचालय अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
- देशाला व राज्याला स्वच्छ बनविणे तसेच नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
- परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरण्यापासून रोखणे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करणे.
- राज्यातील नागरिकांना शौचालय चे महत्व समजावून शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- घरातील महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील दारिद्र्य रेषेवरील कुटुंब
- अनुसूचित जातीतील कुटुंब
- अनुसूचित जमातीतील कुटुंब
- भूमिहीन कुटुंब
- शारीरिक दृष्टया अपंग व्यक्तीचे कुटुंब
- अल्प व माध्यम भूधारक शेतकरी
- कुटुंबातील प्रमुख स्त्रिया असलेले कुटुंब
- शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
- घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- शौचालय अनुदान अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.
योजनेचा फायदा:
- राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्रय रेषेवरील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी शौचालय अनुदान योजनेअंतर्गत 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील आर्थिक दृष्ट्या सर्व गरीब कुटुंबे स्वतःचा शौचालय बांधु शकतील.
- कुटुंबांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज लागणार नाही
- महिलांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज भासणार नाही त्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी तसेच रोगराई कमी होईल
आवश्यक पात्रता:
- ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही असे ग्रामीण आणि शहरी भागातील विहिरीवर अवलंबून असलेले कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
प्राधान्यक्रम:
- विधवा, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि एकल महिला यांना प्राधान्य दिले जाईल.
योजनेच्या अटी व शर्ती:
- केवळ महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांनाच शौचालय अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- शौचालय अनुदान योजनेअंतर्गत फक्त त्याच कुटुंबांचा समाविष्ट करण्यात येईल जे स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी इच्छुक आहेत.
- फक्त दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- ज्या कुटुंबांकडे आधीपासून स्वतःचा शौचालय आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- शौचालय बांधून पूर्ण झाल्यावर त्याची देखभालीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी कुटुंबाची असेल शौचालयाच्या देखभालीसाठी शासनाकडून कुठल्याच प्रकारचे आर्थिक सहाय्य केले जाणार नाही.
- अर्जदार कुटुंबाने या आधीच केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शौचालयाचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शबरी घरकुल योजना तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
- शौचालय अनुदान योजना हि आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचाच असल्याकारणामुळे सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचा तपशील
- उत्पन्नाचा दाखला
- बीपीएल रेशन कार्ड
- घोषणा पत्र
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी अर्जदाराला स्वतःचा मोबाईल नंबर.स्वतःचे नाव,पत्ता,राज्य,कॅप्टचा कोड टाकून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे अर्जदाराची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल व तुमच्या स्क्रीन वर तसा मेसेज सुद्धा दिसेल.
दुसरा टप्पा:
- रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर अर्जदाराला त्याचा Login Id आणि Password टाकून Sign In करायचं आहे.
- लॉगिन झाल्यावर अर्जदाराला त्याचा जुना पासवर्ड बदलण्याचे Option येईल.आता अर्जदाराला जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड ठेवायचा आहे.
- आता अर्जदाराच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये New Application पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- आता अर्जदाराच्या समोर शौचालय अनुदान योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक माहिती, पत्ता तसेच बँक खात्याची माहिती इत्यादी योग्य प्रकारे) भरायची आहे.सर्व माहिती भरून झाल्यावर Apply बटनावर क्लिक करायचं आहे.
- अशा प्रकारे तुमची शौचालय अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
- ग्रामपंचायत कार्यालयातून शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची शौचालय असून योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
- होम पेज वर गेल्यावर login बटनावर क्लिक करून Login करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये View Application बटनावर क्लिक करायचं आहे
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
- अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
Telegram Group | Join |
Shauchalay Anudan Yojana Maharashtra Official Website | Click Here |
Sauchalay Anudan Yojana Maharashtra Email Id | support-nbamis[at]nic[.]in |
महत्वाच्या गोष्टी:
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी सहाय्य्य देऊन देशाला तसेच राज्याला स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली शौचालय अनुदान योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो व त्यामुळे अर्जदाराला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेरी मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत लाभाची राशी लाभार्थ्याला 2 टप्प्यात दिली जाईल.
- या योजनेअंतर्गत जातीची कुठलीच अट निर्धारित केली गेली नाही आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतील.
- ही योजना सतत चालू आहे आणि त्यात थोडेफार बदल होऊ शकतात.