आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF

आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDFClick Here
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF MarathiClick Here
संपर्क क्रमांक1800-233-7337
अधिकृत वेबसाईटClick Here

महाराष्ट्र शासनाने राज्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच समाजातील जाती, धर्म यांमधील भेदभाव कमी करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह अनुदान योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहासाठी 2.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते व इतर मागासवर्गीय आणि सामान्य वर्गातील आंतरजातीय विवाहासाठी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

राज्यातील बहुतांश नागरीकांना या योजनेची माहिती नाही आणि माहिती असली तरी देखील योजनेचे नियम, आवश्यक कागदपत्रे व अर्ज कोठे करावा याची माहिती नसते त्यामुळे आम्ही या आर्टिकल च्या माध्यमातून नागरिकांना सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे आमचे नागरिकांना निवेदन आहे कि त्यांनी सदर माहिती शेवटपर्यंत वाचा व या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवा.

आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF

योजनेचे नियम व अटी

  • योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या जोडप्यांपैकी वधू किंवा वर हा/ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती यापैकी एका जातीचा असणे आवश्यक आहे आणि दुसरा वधू किंवा वर हिंदू, जैन, लिंगायत, शीख धर्माचा असणे आवश्यक आहे.
  • एकाच धर्मात व प्रवर्गात लग्न करणाऱ्या जोडप्यांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • वधूचे वय 18 वर्ष व वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लग्नाची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे
  • अर्जदार जोडपे हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • जोडप्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्ज करताना वधू आणि वर यांच्यातील झालेला विवाह हा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या विवाहासाठी सदर योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
  • वधू आणि वराचे बँक खाते हे जॉईन अकाउंट असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • वधू व वराचे आधार कार्ड
  • लग्न नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक खात्याची माहिती

योजनेअंतर्गत अर्ज कसा आणि कोठे करावा

  • अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली वर दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.