देवदासी कल्याण योजना महाराष्ट्र 2024

महाराष्ट्रातील देवदासी अथवा देवदासींच्या मुलींच्या विवाहासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील देवदासी व त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून त्यांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये.

देवदासी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्रातील 10 वर्षाचे वास्तव्य असलेल्या १९९६ पुर्वीच्या देवदासींना / देवदासींच्या मुलींना विवाहासाठी विवाह सोहळ्याच्या खर्चाकरीता मुलगी पदवीधर नसल्यास 25,000/- रुपये तसेच वधु जर पदवीधर असेल तर मात्र 50,000/- रुपये इतकी रक्कम वधुच्या खात्यात राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येईल.

योजनेचे नावदेवदासी कल्याण योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बाल विकास विभाग
लाभार्थीदेवदासी व त्यांची मुलगी
लाभ50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशदेवदासी प्रथेचे उच्चाटन करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

देवदासी कल्याण योजना महाराष्ट्र उद्देश

  • राज्यातील देवदासी व त्यांच्या मुलींचे जीवनमान सुधारणे.
  • देवदासींच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • देवदासी प्रथेचे उच्चाटन करणे.

देवदासी कल्याण योजना वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.

देवदासी कल्याण योजनेचे लाभार्थी

  • देवदासी व त्यांच्या मुली देवदासी कल्याण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचे लाभ:

  • निर्वाह अनुदान: देवदासींना दर महिन्याला निर्वाह खर्चासाठी ₹6,000/- पर्यंत अनुदान दिले जाते.
  • विवाह अनुदान: देवदासींच्या मुलींच्या विवाहासाठी ₹50,000/- पर्यंत अनुदान दिले जाते.
  • शिक्षण अनुदान: देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी दरवर्षी ₹10,000/- पर्यंत अनुदान दिले जाते.
  • वसतीगृह सुविधा: देवदासींच्या मुलींसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
  • स्वयंरोजगार प्रशिक्षण: देवदासींना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
  • घरकुल योजना: देवदासींना घर बांधण्यासाठी ₹1,50,000/- पर्यंत अनुदान दिले जाते.

देवदासी कल्याण योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य

  • देवदासींना / देवदासींच्या मुलींना विवाहासाठी विवाह सोहळ्याच्या खर्चा करीता मुलगी पदवीधर नसल्यास 25,000/- रुपये तसेच वधु जर पदवीधर असेल तर मात्र 50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाईल.

देवदासी कल्याण योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.

देवदासी कल्याण योजनेच्या अटी व शर्ती

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील देवदासी तसेच त्यांच्या मुलींना लाभ दिला जाईल.
  • अर्जदार देवदासी हि 1996 पूर्वीची मान्यता प्राप्त देवदासी असावी.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील देवदासी तसेच त्यांच्या मुलींना लाभ दिला जाणार नाही.
  • देवदासीचे महाराष्ट्रात 10 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
  • देवदासी किंवा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाच्या मर्यादेत असावे.
  • विवाहेच्छुक देवदासी किंवा तिच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण व वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर 90 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे त्यामुळे त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

देवदासी कल्याण योजनेअंतर्गत अत्यावश्यक कागदपत्रे

सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र होण्यासाठी अर्जदाराने खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक राहील

1. अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
2. अर्जदाराचा देवदासी असल्याबाबतचा दाखला
3. वधूचा वयाचा दाखला
4. वराचा वयाचा दाखला
5. महाराष्ट्रातील वास्तव्य दाखला
6. तहसीलदारांनी दिलेल्या उत्पन्न दाखला
7. विवाह नोंदणीचा दाखला
8. विवाहापूर्वी आलेल्या अर्जाबाबत वधु व वर यांचेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत जिल्हा महिला कार्यालयास सादर करण्यात येईल असे हमीपत्र.
9. पदवीधर देवदासी / देवदासीची मुलगी असल्यास पदवी प्रमाणपत्र किंवा मार्कशीट
10. प्रथम विवाह असल्याबाबतचे हमीपत्र

देवदासी कल्याण योजनेची कार्यपध्दती

सदर अर्ज मंजूर करण्यासंदर्भात कार्यपध्दती खालील प्रमाणे राहील

1. संबंधित अर्जदार महिलेने आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावा.
2. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे गृह चौकशी करतील व अर्जदाराचा अर्ज व कागदपत्रांची छाननी करुन अनुदान मंजूर करतील.
3. विवाहापूर्वी आलेल्या अर्जावर संबंधित अधिकारी तातडीने कार्यवाही करुन विवाह प्रसंगी 25,000/- रुपये अनुदानाचे वितरण करतील  (पदवीधर वधुच्या बाबतीत 50,000/- रुपये) चा धनादेश / धनाकर्ष वधूस सुपूर्द करतील.
4. विवाहानंतर अर्ज प्राप्त झाल्यास प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दिड महिन्याच्या आत अनुदान मंजूरी व अनुदान वितरणाची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

देवदासींच्या मुलामुलींना शिक्षणासाठी मदत योजना

देवदासी प्रथेच्या समुळ उच्चाटनासाठी अधिकृत देवदासींच्या इयत्ता 1ली व ते इयत्ता 10वी पर्यंतच्या मुला मुलींना शिक्षणासाठी मदत म्हणून शासनामार्फत सदर अनुदान विद्यार्थी / विद्यार्थीनी यांना दरवर्षी पुस्तके, वह्या, इतर शालेय साहित्य, गणवेश यासाठी सरसकट मुलास 1600/- रुपये व मुलीस 1750/- रुपये एवढी रक्कम दिली जाईल.

लाभासाठी अर्हता

सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र होण्यासाठी अर्हता खालील प्रमाणे राहील

1. दोन अपत्यांपर्यंत लाभ मर्यादित राहील.
2. सदर अनुदान हे जिल्हा परिषद शाळा, महानगर पालिका शाळा तसेच मान्यता प्राप्त खाजगी शिक्षण संस्थेमधून शिकणाऱ्या इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या देवदासीच्या मुला मुलींसाठी अनुज्ञेय राहिल.
3. योजनेचा लाभ हा 1996 पूर्वीच्या 3000 नोंदविलेल्या देवदासींच्या मुला मुलींनाच अनुज्ञेय राहिल.
4. देवदासींचे महाराष्ट्रातील वास्तव्य 10 वर्षे असावे.
5. देवदासी किंवा तिच्या कुटुंबियांचे उत्पन्न शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबाच्या मर्यादेत असावे.

आवश्यक कागदपत्रे

सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र होण्यासाठी अर्जदाराने खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक राहील

1 विहित नमुन्यातील अर्ज
2. लाभार्थ्यांच्या शालेय वर्गाबाबत तसेच येणाऱ्या संभाव्य खर्चाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र
3. सन 1996 पुर्वीची देवदासी असल्याबाबतचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
4. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
5. 10 वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला
6. पाल्य चालू वर्षात घेत असलेले शिक्षण पुर्ण करणार असलेबाबत व मिळालेले अनुदान आपल्या मुलांच्या शिक्षणाकरीता वापरणार असल्याचे पालकांचे हमीपत्र.

कार्यपध्दती

सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र होण्यासाठी अर्जदाराने अर्ज करण्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे करणे आवश्यक राहील

1. देवदासींच्या इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या मुला मुलींना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून या योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अपुरे आहे. सदर अनुदान दर वर्षी देताना प्रत्येक विद्यार्थ्यास येणारा खर्च शाळेच्या मुख्यध्यापकांमार्फत विद्यार्थ्यांच्या नावानीशी तो ज्या इयत्तेमध्ये शिकत आहे त्या इयत्तेसाठी व त्या वर्षी शालेय साहित्य, गणवेश इ. साठी लागणाऱ्या खर्चाच्या रक्कमेसह प्रमाणित करुन घेवून त्याप्रमाणे सहाय्यक अनुदान वितरणाचा प्रस्ताव शाळा सुरु झाल्यापासून दिड महिन्याच्या आत संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करतील.
2. वार्षिक उत्पन्नाची अट सामाजिक न्याय विभागाने सुधारित केलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबाच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणे राहील.
3. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दिड महिन्याच्या आत त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन अर्जदार देवदासी महिलेच्या बँक खात्यावर मुख्यध्यापकांनी प्रमाणित केल्याप्रमाणे रक्कम जमा केली जाईल.
4. सदर रक्कम ज्या कारणासाठी अदा केलेली आहे त्याच कारणासाठी तिचा वापर केला आहे याबाबतचे हमीपत्र वजा उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित अर्जदार देवदासी महिलेकडून शाळेच्या मुख्यध्यापक घेतील.
5. सर्व अर्जदार देवदासी महिलांचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सारांश उपयोगिता प्रमाणपत्र / अहवाल व संबंधित अर्जदार महिलांनी लिहून दिलेले हमीपत्र वजा उपयोगिता प्रमाणपत्र मुख्यध्यापकांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना दिड महिन्याच्या आत सादर करतील.

Telegram GroupJoin
Devdasi Kalyan Scheme Maharashtra GRClick Here

योजनेच्या अधिक माहितीसाठी:

  • महिला आणि बालविकास विभागाची अधिकृत वेबसाइट: https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/csr.php
  • ला भेट द्यावी.
  • जवळचे महिला आणि बालविकास कार्यालय किंवा जिल्हा समाजकल्याण कार्यालय यामध्ये संपर्क साधावा.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!