महिला बचत गट शासकीय योजना

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वतःचा एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा त्यांच्या सुरु असलेल्या एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी कायमस्वरूपी साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते शहरी भागात रोजगार उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते व अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाकडे उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा तो सुरु करता येत नाही तसेच बँक व वित्त संस्था महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्यासाठी उत्सुक नसतात कारण महिला घेतलेले कर्ज परत फेडू शकतील कि नाही याची शंका असते तसेच साहुकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेणे महिलांना शक्य नसते त्यामुळे राज्यातील बहुतांश महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे राज्यातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यात महिला बचत गट योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सुशिक्षित महिलांना त्यांचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून महिला स्वतःचा लघु उद्योग सुरु करून राज्याचा आर्थिक विकास करू शकतील. [बचत गट शासकीय योजना]

योजनेचे नावMahila Bachat Gat Yojana
लाभार्थीराज्यातील बचत गटातील महिला
लाभउद्योग सुरु करण्यासाठी
5 लाख ते 20 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
व्याजदर4 टक्के
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

महिला बचत गट शासकीय योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा बचत गटातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा महिला बचत गट शासकीय योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे.
  • बचत गटातील ज्या महिलांना स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे अशा महिलांना योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • महिलांनी सुरु केलेल्या उद्योगाला चालना देणे.
  • महिला आर्थिक दृष्ट्या बळकट व्हाव्यात.
  • राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढविणे.
बचत गट शासकीय योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • योजनेअंतर्गत कमीत कमी अटी आणि शर्तींचा वापर करून कमी व्याजदराने महिलांसाठी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून इच्छुक महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील.
  • या योजनेनंतर्गत 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला सहभाग शून्य असतो.
  • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गटातील महिलांना योजनेअंतर्गत सहभागी करून घेतले जाते. [बचत गट शासकीय योजना]

योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

योजनेअंतर्गत आकारले जाणारे व्याजदर:

  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत कर्जावर 4 टक्के व्याजदर आकारला जातो.

Mahila Bachat Gat Yojana अंतर्गत कर्ज परत फेडीचा कालावधी

  • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थी महिलांना 3 वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे अनिवार्य आहे.

महिला बचत गट कर्ज योजना 2024 चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ दिला जातो. [बचत गट शासकीय योजना]

महिला बचत गट योजना अंतर्गत दिला जाणारा लाभ

  • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी महिला कर्ज योजना अंतर्गत नाममात्र अटी व शर्तींवर 4 टक्के व्याज दराने 5 लाख ते 20 लाखापर्यंत 3 वर्षाच्या मुदतीवर कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिला बचत गटाचे फायदे

  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिला बचत गट कर्ज योजना 2024 अंतर्गत राज्यातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील व राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार महिलांना व नागरिकांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतर थांबेल.
  • योजनेअंतर्गत महिला राज्यात नवीन उद्योग सुरु करू शकतील त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगार कमी होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन राज्याचा औद्योगिक विकास होईल.
  • राज्यातील महिला स्वावलंबी बनतील. [बचत गट शासकीय योजना]
  • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक स्तर उंचावेल.
  • राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावेल
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या कुटुंबांचा सांभाळ करू शकतील.
  • महिला बचत गट कर्ज योजनेच्या सहाय्याने महिला उद्योजकांस प्रोत्साहन मिळेल. [बचत गट शासकीय योजना]

महिलांसाठी व्यवसाय कर्ज योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे.

Mahila Bachat Gat Loan Rules In Marathi

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच Mahila Loan Scheme चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • फक्त महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल व पुरुष उद्योजकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेनंतर्गत 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला सहभाग शून्य असतो परंतु काही कारणास्तव राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेला स्वतःकडील 5 टक्के रक्कम भरावी लागेल.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कर्जाचे वितरण केलेल्या तारखेपासून घेतलेले कर्ज 4 वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांनी बचत गट स्थापन करून किमान 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल अशाच महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • महिला कर्ज योजना अंतर्गत जास्तीत जास्त 20 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते परंतु त्यापेक्षा जास्त लागणारी रक्कम लाभार्थ्यास स्वतःकडील भरणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील चालणार नाही.
  • अर्जदार महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
  • अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल. [बचत गट शासकीय योजना]

महिला कर्ज योजना Maharashtra अंतर्गत कुटुंबाचे आवश्यक वार्षिक उत्पन्न

  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
ग्रामीण भागासाठी98,000/- रुपये
शहरी भागासाठी1.2 लाख रुपये

Mahila Bachat Gat Loan Information In Marathi अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जन्म प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँकेचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
  • शपथ पत्र

Mahila Bachat Gat Loan Apply Online

  • अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन बचत गट शासकीय योजना चा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली अर्ज डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तेथून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [बचत गट शासकीय योजना]
Telegram GroupJoin
Bachat Gat Mahila Karj Yojana Form PDFClick Here
महिला बचत गट नोंदणी अर्जClick Here
बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुनाClick Here
  • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना

बचतगट योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

Mahila Bachat Gat Government Schemes कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

बचत गट शासकीय योजना चे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिला.

महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ काय आहे?

योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Mahila Bachat Gat Yojana 2024 चा उद्देश काय आहे?

राज्यातील बचत गटातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व राज्यातील बेरोजगार कमी करणे.

Bachat Gat Interest Rate

महिला बचत गट कर्ज योजनेचा व्याजदर 4 टक्के आहे

बचत गट शासकीय योजना अंतर्गत दिले जाणारे कर्ज किती वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे?

महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज 3 वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे.

Bachat Gat Information In Marathi अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

महिला बचत गट योजना अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

सारांश

आम्ही आशा करतो की आपल्याला बचत गट शासकीय योजना अंतर्गत सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [बचत गट शासकीय योजना]

8 thoughts on “महिला बचत गट शासकीय योजना”

  1. माझा आदिशक्ती महिला बचत गट आहे Tata ACE छोटा हाती गाडीत पोळी भाजी विक्रीकेद्र चालु करायचे आहे कर्ज कसे उपलब्ध होईल 9920402201 कळावे

    Reply
  2. माझा मातृवंदे स्वयं सहायता समुह आहे मी त्या समुहाची अध्यक्ष आहे माझ्या गटाला 3 वर्ष झाले आहे मी होम क्लिनिंग प्रोडेक्ट जसे फिनाईल, डिशवॉश, टॉयलेट क्लिनर, हॅन्ड वॉश इत्यादी स्वतः घरी बनवते तसेच जैविक गांडुळ खाद व कीटकनाशक औषध तयार करते पण या साठी मला शासकीय योजनांचा कोणताही लाभ मिळत नाही जिल्हा परिषद चे अधिकारी व बिडीओ येऊन तपास करून जातात आम्ही योजनेचा लाभ करून देऊ तुम्हाला सांगतात पण काही करीत नाही तर काय मला महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ मिळु शकेल का?

    Reply
    • जर तुम्ही एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असाल किंवा सुरु असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी इच्छुक असाल तर महिला बचत गट कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कारण महिला बचत गट कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे कि उद्योगाला चालना देणे.

      Reply
  3. मला बचत गट चालू करायचे आहे महिला वर्ग सुद्धा माझ्या कडे आहे पण कसे चालू करू

    Reply
    • तुम्ही महिला बचत गट कार्यालयात संपर्क साधा किंवा तुमच्या जवळच्या बँकेत संपर्क साधा.

      Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!