स्वाधार योजना अंतर्गत अर्ज करताना विद्यार्थ्याने आवश्यक पात्रता व अटी यांचे पालन करणे आवश्यक आहे जर अर्जदार पात्रता, अटी व शर्तींचे पालन करत नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल त्यामुळे आम्ही खाली पात्रता, अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील असावा.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
- इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.
- इयत्ता 12वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
- दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
- इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
- स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
- अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
- अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
- लाभार्थी विद्यार्थ्याने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल.
- प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
- सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
- विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
- या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.
- अपूर्ण भरलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज तसेच अर्जात खोटी माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
स्वाधार योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Telegram Group | Join |
स्वाधार योजना शासन निर्णय | Click Here |
स्वाधार योजना अर्ज | Click Here |