स्वाधार योजना माहिती मराठी

स्वाधार योजना माहिती मराठी: या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी त्यांना 65000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतर च्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृहे यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात जे त्यांना अशक्य असते या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11वी व त्या पुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.

दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात झालेली वाढ तसेच राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी/12वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.

योजनेचे नावस्वाधार योजना माहिती मराठी
राज्यमहाराष्ट्र
विभागसमाज कल्याण विभाग
लाभार्थीअनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
उद्देशविद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणे.
  • समाजातील मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे.
  • स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील.
स्वाधार योजना माहिती मराठी

योजनेचे वैशिष्ट्य:

  • राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
  • योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.

मुंबई शहर, मुंबई उपनगर,
नवी मुंबई, ठाणे, पुणे,
पिंपरी चिंचवड, नागपूर
या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
महसूल विभागीय शहर व
क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
उर्वरित शहरात उच्च शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता
(वार्षिक)
32000/- रुपये28000/- रुपये25000/- रुपये
निवास भत्ता
(वार्षिक)
20000/- रुपये15000/- रुपये12000/- रुपये
निर्वाह भत्ता
(वार्षिक)
8000/- रुपये8000/- रुपये6000/- रुपये
एकूण
(वार्षिक)
60000/- रुपये51000/- रुपये43000/- रुपये
  • वरील रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील/विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000/- रुपये व
  • अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.

स्वाधार योजना माहिती मराठी:

  • अपुर्ण भरलेले अर्ज आणी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
  • 60% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.
  • जिल्हा निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असुन त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
  • निवड यादी संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली जाईल निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.

योजनेचे निकष:

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करतील.
  • सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छानणी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे जिल्हयातील जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहांशी संलग्न (attach) करतील.
  • सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पध्दतीने या योजने साठी अर्ज करावा लागेल.

योजनेचे लाभार्थी:

  • अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील दुसऱ्या शहरात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

योजनेचा फायदा:

  • भत्ता लाभ: दुसऱ्या राज्यात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक विषयाचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता दिला जातो,
  • शिक्षण पूर्ण करता येईल: अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी स्वाधार योजनेच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
  • पुस्तके आणि अभ्यास साहित्य: विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तके आणि अभ्यास साहित्यासाठी 5000/- रुपये पर्यंतची अतिरिक्त आर्थिक मदत मिळते.

योजनेअंतर्गत लाभाचे वितरण:

  • विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादर करतील व संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
  • DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS पध्दतीने त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांने संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.
  • जे विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 जून
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट
  • ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा
  • अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील असावा.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • राज्य: फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातील.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • जातीचा प्रवर्ग: स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
  • शैक्षणिक गुण: इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.
  • इयत्ता 12वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
  • दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
  • अभ्यासक्रमाचा कालवधी: इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  • दिव्यांगांना आरक्षण: स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.
  • वार्षिक उत्पन्न: अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अभ्यासक्रम: विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
  • अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • लाभार्थी विद्यार्थ्याने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल.
  • प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
  • सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
  • विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
  • या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
  • पत्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल
  • रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र / उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला (आवश्यक असल्यास)
  • गुणपत्रिका: मागील वर्षातील गुणपत्रिका
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • फोटो: पासपोर्ट साईज फोटो
  • उपस्थिती प्रमाणपत्र: विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील: बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
  • उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला
  • जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला
  • शपथपत्र
  • विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
  • महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC
  • स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती
  • मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
  • भाडे करारनामा

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
  • कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालय जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर स्वतःच Username Email आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.(अर्जदार विद्यार्थ्याजवळ Username आणि Password नसल्यास स्वतःची नवीन नोंदणी करावी लागेल)
swadhar yojana login

  • विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज Submit करावा लागेल.

स्वाधार योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे न जोडल्यास.
  • अर्जदार विद्यार्थी पात्रता व अटी यांची पूर्तता करत नसल्यास
  • खोटी कागदपत्रे जोडून अर्ज केल्यास
  • अंतिम तारखेच्या आत अर्ज न भरल्यास
  • योजना बंद झाल्यास किंवा निधी संपल्यास

स्वाधार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागले.
  • होम पेज वर For Registration वर क्लिक करावे लागेल.
swadhar yojana new registration

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
swadhar yojana regisration form

योजनेअंतर्गत अर्ज रद्द झाल्यास:

  • तुमचा अर्ज रद्द झाल्यास तुम्हाला अर्ज रद्द करण्याचे कारण ई-मेल किंवा मेसेज द्वारे कळविण्यात येईल.
  • त्यानंतर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून रद्दीकरणाचे कारण आणि त्यावर अपील कसे करावे याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
  • चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती करून पुन्हा अर्ज जमा करा.
  • अपूर्ण माहिती असल्यास पूर्ण करून पुन्हा अर्ज जमा करा.
Telegram GroupJoin
स्वाधार योजना शासन निर्णयClick Here
स्वाधार योजना अर्जClick Here
Swadhar Yojana Documents List In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रांची यादी मराठीत
Click Here
टोल फ्री क्रमांक020-22179917
अधिकृत पोर्टलClick Here

महत्वाची गोष्ट:

योजनेचे नियम व अटी यांमध्ये बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

12 thoughts on “स्वाधार योजना माहिती मराठी”

  1. स्वाधार योजनेचा एकदा अर्ज भरल्यानंतर दुसऱ्यांदा जर मुदत निघून गेली/भरता आला नाही तर तिसऱ्यांदा आपल्याला भरता येईल का कृपया मार्गदर्शन करावे

    Reply
    • जर मुदत निघून गेली आणि काही कारणास्तव तुम्हाला अर्ज भरता आला नाही तर अशा परिस्थिती तुम्ही तिसऱ्यांदा अर्ज करू शकता.

      Reply
  2. स्वाधार योजनेसाठी गॅप ३ वर्षाचा असेल तर संबंधित विद्यार्थ्याला लाभ मिळत नाही असे म्हणत आहेत कृपया मार्गदर्शन् करावे…

    Reply
    • जर एखाद्या विद्यार्थ्याला गॅप असेल तर वकिलामार्फत ऍफिडेव्हिट बनवून अर्जासोबत सादर करावे.

      Reply
  3. मी B A 1St year ला स्वाधार योजनेचा लाभ घेतला आहे,आणि आता मी बा च ऍडमिशन रद्द करून BCA ला ऍडमिशन केलं आहे तर मी फॉर्म भरू शकतो का

    Reply
  4. माझ कॉलेज समाज कल्याण कार्यालय पासुन 25 किमी दूर आहे मी अर्ज करू शकतो का

    Reply
  5. माझ्या मुलीचेकॉलेज उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 50किमी दूर आहे
    ती या योजनेत फॉर्म भरू शकते का?

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!