लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे राज्यातील मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी 2023 च्या बजट मध्ये सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य करणे.

या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून तिचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या शिक्षणासाठी एकूण 98,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 5 टप्प्यात करण्यात येते जे तिच्या वयानुसार आणि शिक्षानुसार वेगवेगळी असेल.
लेक लाडकी योजना मुख्य करून मुलींसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.

योजनेचे नावLek Ladki Yojana Information In Marathi
उद्देशमुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
लाभएकूण 98,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/ऑनलाईन

योजनेचे उद्दिष्ट:

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य करणे.
  • समाजात मुलींबद्दल असलेल्या नकारात्मक विचारांना संपवून गर्भ हत्येला आळा घालणे.
  • मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच शिक्षणाची आवड निर्माण करणे.
  • राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे.
  • पैशानं अभावी गरीब कुटुंबातील मुली शिक्षणाशिवाय वंचित राहू नये.
  • मुलींना स्वावलंबी बनविणे.
  • मुलींना शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या बळकट करणे.
  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे.
  • मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे व चालना देणे.
  • मुलीचे सक्षमीकरण करणे.
  • मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे गरीब कुटुंबाला अर्ज करताना कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार टाळला जाईल.
  • या योजनेअंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच तो उंचावण्यास मदत होईल.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
  • पिवळा आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबे

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

टप्पारक्कम
पहिलामुलीच्या जन्मानंतर5,000/- रुपये
दुसरामुलगी इयत्ता 1ली मध्ये गेल्यावर6,000/- रुपये
तिसरामुलगी 6वी मध्ये गेल्यावर7,000/- रुपये
चौथामुलगी 11वी मध्ये गेल्यावर8,000/- रुपये
पाचवामुलगी 18 वर्षाची झाल्यावर75,000/- रुपये
एकूण लाभ1,01,000/- रुपये

योजनेचा फायदा:

  • लेक लाडकी योजना अंतर्गत राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एकूण 98 हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली कुठल्याही अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सामाजिक विकास करू शकतील.
  • जेव्हा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होते तेव्हा तिच्या बँक खात्यात 75,000/- रुपये DBT च्या सहाय्याने जमा केले जातात जेणेंकरू मुलींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने समाजात मुलगा मुलगी भेदभाव कमी होण्यास मदत होईल.
  • राज्यात गर्भ हत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने मुली शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
Lek Ladki Yojana Maharashtra

आवश्यक पात्रता व अटी:

  • अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेली कुटुंबे लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • अर्जदार मुलगी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवत असता कामा नये.
  • मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तिच्या बँक खात्यात 75,000/- रुपयांची राशी जमा केली जाईल त्याआधी  तिच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार नाही.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीला स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामुळे जर मुलीने एखाद्या कारणास्तव शिक्षण सोडले तर अशा परिस्थिती तिला लाभाची राशी दिली जाणार नाही.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असता कामा नये.
  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक 1 एप्रिल, 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम १ लाखापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे:

  • मुलीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम
  • अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  • अर्जदार मुलीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  • संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)
  • मोबाईल नंबर

योजनेअंतर्गत लाभ घेण्याची कार्यपद्धती:

  • सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचेमार्फत त्यांच्या स्तरावरून सुधारणा केली जाईल. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविका संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घेतील. गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत केली जाईल आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी / तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करतील. जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद / नोडल अधिकारी हे योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता देवून आयुक्तालयास सादर करतील. अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद हे यादृच्छिक (Random) पध्दतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील.
  • पर्यवेक्षिका / बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवले जाईल. त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करू शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात येईल. अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद / नोडल अधिकारी यांनी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयाकडे सादर करतील.

योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहील:

1. फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे

लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका / मुख्यसेविका करतील. तसेच, लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करतील.

2. अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका हे लाभार्थी पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करतील. सक्षम अधिकारी हे या कामकाजावर नियंत्रण ठेवतील. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील.

Lek Ladki Yojana Maharashtra

योजनेअंतर्गत अर्ज जतन करणेबाबत

अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका हे अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केले असल्याबाबतची सक्षम अधिकारी खातरजमा करतील. आयुक्तालय स्तरावरील राज्य कक्षातील कर्मचारी तसेच, जिल्हा स्तरावरील अधिकारी सदर अर्ज Digitized करून लाभार्थ्यास अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची दक्षता घेतील.

काही महत्वाच्या गोष्टी:

  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे देण्यात येईल. त्याकरिता महिला व बाल विकास विभाग स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँकेमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येऊन त्यामधून पोर्टलप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद यांना तर नागरी क्षेत्राच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व ते थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतील. त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे. मात्र, अशा प्रकरणात अर्ज सादर करतांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पध्दतीने त्यांना देण्यात येतो, त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
  • एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा. सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाकडे शिफ़ारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्षाने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
  • या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरीता तसेच पोर्टलचे संचालन, अर्ज Digitized पध्दतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार विहित पध्दतीने तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात यावी.
  • सदर योजना सुरू झाल्यापासून 5 वर्षांनंतर योजनेचे मुल्यमापन करून योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत अथवा सुधारणेसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
  • दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र, त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील, तदनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार मुलगी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात जावे लागेल  व लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथमलेक लाडकी योजना च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर लेक लाडकी योजना वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती सोबत जोडावी लागेल व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GoupJoin
Lek Ladki Yojana Form PDF DownloadClick Here
लेक लाडकी योजना शासन निर्णयClick Here
Lek Ladki Yojana Gr pdfClick Here
लेक लाडकी योजना फॉर्म मराठीClick Here
लेक लाडकी योजना माहिती pdfClick Here
Lek Majhi Ladki Yojana Online FormClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

3 thoughts on “लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा”

  1. लेक लाडकी योजना वीस वर्षानंतर त्याचा लाभ घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!