या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते..
राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अधिक योजना आहे.
राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे व राज्यातील शेतकरी दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्याच्या कुटुंबाचे जीवन शेती पिकावर अवलंबून असते शेतीसाठी ते बँक, साहुकार यांच्याकडून व्याजाने कर्ज घेतो व अहोरात्र ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता शेती करतो शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते परंतु राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे व त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पुर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होते आहे व त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे व याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे व कर्जाच्या बोज्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.
पावसात सततचा पडणारा खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे होणारे अतोनात नुकसान या शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पाण्याचा स्रोत निर्माण व्हावा व त्यांच्या पिकांचे नुकसान टाळता यावे यासाठी संपूर्ण राज्यात मागेल त्याला शेततळे सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी Shettale Yojana जाहीर केली.
या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडीत कालावधीत फायदा झाला असून उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यास संजीवनी देणारी योजना ठरली आहे.
Magel Tyala Shettale Yojana चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करणे व त्यासाठी त्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
योजनेचे नाव | शेततळे योजना |
लाभ | 50 हजार रुपये |
उद्देश्य | शेतात शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
शेततळे अनुदान योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात तळे खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- शेती पिकाचे होणारे नुकसान टाळणे व शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे.
- शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत अनुदानाची कमाल रक्कम 50,000/- रुपये इतकी राहील जी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्राथमिकता:
लाभार्थी निवड खालील प्राथमिकतेनुसार करण्यात येईल.
- दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल.
- इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार ( प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे) सदर योजने अंतर्गत निवड करण्यात येईल.
योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अनुज्ञेय आकारमान व अनुदान:
- या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारचे शेततळे घेण्यास मुभा राहील.
- आकारमान निहाय शेततळयाचे पृष्ठभागा वरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित खोदकाम खालील प्रमाणे राहील.
- शेततळे अनुदान योजना अंतर्गत वरीलप्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल.
- यामध्ये जास्तीत जास्त 30x30x3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15X15X3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
- तसेच इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये किमान 20×15 x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
- इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये पाणी भरण्याची कार्यवाही पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून प्राधान्याने करावी.
योजनेअंतर्गत शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष:
शेततळे ही योजना कृषि विभागामार्फत पाणलोटाचा उपचार म्हणून पूर्वीपासूनच राबविण्यांत येत आहे. जागेच्या निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे राहतील.
- ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमीन ज्यात चिकनमातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळयास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
- मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यास निवडू नये.
- क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.
- टंचाईग्रस्त गावातील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावीत. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या अटी व शर्ती लागू राहतील.
- ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्याच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत.
- नाल्याच्या / ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
- इनलेट / आऊटलेट सहीत शेततळयासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळयाच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.
- सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होईल तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्यांच्या स्थावर / जंगम मालमत्तेचे नुकसान होईल अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडण्यात येऊ नयेत.
- शेततळयाला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामुल्य द्यावयाची आहे.
अंमलबजावणीचे वेळापत्रक:
लाभार्थ्यांची जबाबदारी:
- कृषि विभागाचे कृषि सहायक / कृषि सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील.
- कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थीने स्वत:चा राष्ट्रीयकृत बँक / इतर बँके मधील खाते क्रमांक संबंधित कृषि सहायक / कृषि सेवक यांचेकडे पासबुकाच्या झेरॉक्ससह सादर करावा.
- कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही.
- शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करावी.
- शेततळ्याची निगा व दुरूस्तीची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहील.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: करावी.
- लाभार्थ्यांच्या 7/12 चे उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.
- शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.
- मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील. इनलेट आऊटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थीकडे शेततळ्यामध्ये पाणी उचलून टाकण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेततळ्यासाठी शेतकऱ्यांनी प्लॅस्टीक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील शेतकरी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- शेततळ्यामुळे सिंचनासाठी व पूरक कृषी उद्योगांसाठी (उदा. पशुवर्धन, मत्स्योत्पादन ई.) वापर करू शकतील.
- शेततळ्यामुळे सिंचन करणे शक्य होईल व परिणामी शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
- शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान होणार नाही.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे बंधनकारक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना शेततळे अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
- अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील.
- निश्चित केलेल्या आकारमानाचेच शेततळे घेणे बंधनकारक राहील.
- काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- काम पूर्ण झाल्यावरच अनुदानाची मागणी करता येईल.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरुन पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
- |मजूर / मशिनच्या मालकास शासनाकडून परस्पर पेमेंट केले जाणार नाही.
- शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक राहील.
- या योजनेअंतर्गत अनुदानाची कमाल रक्कम 50,000/- रुपये इतकी राहील. व 50,000/- रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे अनिवार्य राहील.
- यापुर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
- शेततळ्याची निगा / दुरूस्तीची जबाबदारी शेतकऱ्यावर राहील.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साठणार नाही यासाठी व्यवस्था करावी लागेल.
- शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यास स्वखर्चाने करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनीचा 7/12 व 8अ
- प्रतिज्ञा पत्र
संकेत स्थळावर नोंदणी करताना मार्गदर्शक सूचना:
- अर्ज संपूर्णपणे भरल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी व स्कॅन करावे. स्कॅन केलेल्या File ची Size 150 KB पेक्षा जास्त असू नये.
- आवश्यक असलेली कागदपत्रे वेगवेगळी स्कॅन करावीत. स्कॅन केलेल्या Fileची Size 150 KB पेक्षा जास्त असू नये.
- ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर माहिती भरून त्यासोबत कागदपत्रे केलेले मुळ प्रपत्र अपलोड करावयाची आहेत.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे पोच पावती देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर मागेल त्याला शेततळे पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यकता ती कागदपत्रे जोडावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे मागेल त्याला शेततळे योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
Magel Tyala Shetatale Yojana Online Application | Click Here |
Magel Tyala Shettale Online Application Form | Click Here |
शेततळ्यासाठी किती योजना आहेत, सर्वात चांगली कोणती, आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे,शेततळ्यासाठी पात्रता काय आसते..
मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक पात्रता
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
जातीचा दाखला
दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
जमिनीचा 7/12 व 8अ
प्रतिज्ञा पत्र